नवी दिल्ली : केरळच्या वायनाडमधील काँग्रेस कार्यालयात गेल्या जूनमध्ये झालेल्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी चार काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पण पोलिसांनी कारवाई करत यामागे काँग्रेस कार्यकर्ते असल्याचे उघड केले. तसेच त्यात कार्यालयातील कर्मचारी देखील असल्याचे सांगण्यात येते.
Kerala | 4 Congress workers incl MP Rahul Gandhi's staff arrested for vandalizing a picture of Mahatma Gandhi in his Wayanand office: Kalpetta police
Congress had earlier alleged that it was SFI workers who vandalized the picture in Congress MP Rahul Gandhi's office in Wayanad https://t.co/gN9R6GvkUs
— ANI (@ANI) August 19, 2022
या वर्षाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणविषयक एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. संरक्षित जंगले तसेच अभयारण्यांभोवतालचा एक किलोमीटरचा परिसर हा पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) असेल, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. मात्र यामुळे या परिसरात राहणाऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातून वाद निर्माण झाला आणि 24 जूनला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयात माकपाशी संलग्न विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, असे सांगण्यात येत होते. यामध्ये महात्मा गांधी गांधी यांची फोटोफ्रेमही तोडल्याचे सांगितले गेले.
पण कालपेट्टा पोलिसांनी केलेल्या तपासात ही तोडफोड एसएफआय नव्हे तर, काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसत्या चार कार्यकर्त्यांना अटक केली. त्यात राहुल गांधी यांच्या पीएचाही समावेश आहे. तथापि, काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
तोडफोडीचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाच्या झालेल्या तोडफोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. काही आंदोलक कार्यालयाच्या खिडकीतून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. तर, काहींनी आतमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली होती, असे या व्हिडीओत चित्रीत झाले होते.