मे महिन्यात Swiggyच्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा

संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांचाही विचार करणे महत्त्वाचे

four-day work week for Swiggy employees from Month of May
मे महिन्यात Swiggyच्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा

ऑनलाईन फूड डिलिव्हर करणाऱ्या स्विगी कंपनीने कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पाश्वभूमीवर स्विगीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यात स्विगीच्या कर्मचाऱ्यांसाठी केवळ चार दिवसांचा आठवडा असणार आहे. आठवड्यातून केवळ चारच दिवस कर्मचारी कामावर येतील. इतर दिवशी घरी राहून आराम करावा असे स्विगीकडून सांगण्यात आले आहे. ‘मे महिन्यापासून स्विगीच्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा असेल. तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणते चार दिवस काम करायचे आहे आणि कोणत्या दिवशी विश्रांती घ्यायची आहे. तुमच्यासोबत तुमच्या मित्रांची आणि कुटुंबाची काळजी घ्या’, असे स्विगीच्या एचआर प्रमुख गिरीश मेनन यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या महामारीत लोकांच्या घरपोच अन्न पोहचवण्याचे महत्त्वाचे स्विगीसह सर्व फूड डिलिव्हर करणाऱ्या कंपन्यांनी केले आहे. मात्र संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. शिल्ड अँप आणि कर्मचारी सपोर्ट हॉटलाईनच्या माध्यामातून कोरोनाच्या काळात सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर करण्यात आले आहे जे कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेड,आयसीयू,प्लाझ्मा,ऑक्सिजन बेडच्या सुविधा पुरवत आहे. त्याचप्रमाणे होम क्वारंटाईन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला व मेडिकल मदत पुरवत देखिल पुरवत आहे.

सध्याच्या परिस्थिती कर्मचाऱ्यांच्या अँडव्हान्स पगाराचीही कंपनीने सोय केली आहे. कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कंपनीतील ग्रेड १ त ६ मधील कर्मचाऱ्यांना मे महिन्यातील पगार लवकर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर स्विगी त्यांना पोषक सहाय्य देखिल करणार आहे. आतापर्यंत स्विगीने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी जवळपास २ लाखाहून अधिक लसीकरण केले आहे.


हेही वाचा – Covid-19 Vaccine घेतल्यानंतर धुम्रपान करताय? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत