ब्रिटनमध्ये ‘चार’ दिवसांचा आठवडा; कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय

चार दिवसांचा आठवण्याची (Four days of week) नवी योजना लागू करण्याचा निर्णय अखेर ब्रिटेनने (Britain) घेतला आहे. येत्या सोमवारपासून ही योजना सुरू होणार असून यामध्ये कोणाच्याही पगारात कपात होणार नाही.

Office Work

चार दिवसांचा आठवण्याची (Four days of week) नवी योजना लागू करण्याचा निर्णय अखेर ब्रिटेनने (Britain) घेतला आहे. येत्या सोमवारपासून ही योजना सुरू होणार असून यामध्ये कोणाच्याही पगारात कपात होणार नाही. हॉटेल्स, आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या, अशा सर्वच क्षेत्रातल्या कंपन्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत. (Four Day Working Week In Britain)

या योजनेला प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत असून यामध्ये ब्रिटनमधल्या ७० कंपन्यांमधले साडेतीन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. ही ट्रायल १००:८०:१०० मॉडेलवर आधारीत आहे. त्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांना ८० टक्के वेळ काम करून १०० टक्के पगार दिला जाणार आहे. आणि त्यांना १०० टक्के उत्पादनक्षमता वापरली जाणार आहे.

चार दिवसांचा आठवडा हा प्रायोगिक कार्यक्रम थिंक टँक ऑटोनॉमीच्या सहकार्याने, तसेच केम्ब्रिज विद्यापीठ (Cambridge University), ऑक्सफोर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि बोस्टन कॉलेज (Boston College) इथल्या संशोधकांच्या समन्वयाने जागतिक पातळीवर राबवला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त सुट्टीबद्दल कर्मचाऱ्याच्या भावना काय आहेत, ते कसा प्रतिसाद देतात, याकडे लक्ष दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांचा ताण कमी होतोय का, नोकरी आणि आयुष्याबद्दलचे समाधान, आरोग्य, झोप, ताकदीचा वापर, प्रवास आणि आयुष्यातल्या इतर पैलूंचाही विचार केला जाणार आहे.

सरकारचे समर्थन असलेल्या चार दिवसांच्या आठवड्याच्या या ट्रायलमध्ये पुढे याच वर्षी स्पेन आणि स्कॉटलँडही सहभागी होणार असल्याचे समजते.


हेही वाचा – Partygate Scandal: बोरिस जॉन्सनच राहणार UK चे पंतप्रधान, 359 खासदारांपैकी 211 खासदारांचा पाठिंबा