आठवड्यातून चार दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी, ब्रिटनमध्ये प्रयोग यशस्वी

आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम हा प्रयोग जगभरातील 100 कंपन्यांनी सुरू केला आहे. भारतातही अशाच प्रकारचा प्रयोग प्रोयोगिक तत्वावर राबविण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. परदेशात म्हणजे यूकेमध्ये 100 कंपन्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी 4 दिवस वर्किंग डेज सुरू केले आहेत. मात्र, यामध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केलेली नाही. या नव्या प्रयोगामुळे कौशल्यशक्तीत आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल होईल, अशी आशा कंपन्यांना आहे.

4 वर्किंग डेचा समावेश करणाऱ्या 100 कंपन्यांपैकी 2 बड्या कंपन्याचा समावेश आहे. त्यात एटोम बॅक आणि ग्लोबल मार्केटिंग कंपनी एव्हिन आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीत 450 कर्मचारी आहेत. मायक्रोसॉफ्टनेही 2019 मध्ये आपल्या जपानमधील आँफिसमध्ये प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी सुरु केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कौशल्यक्षमतेत वाढ झाली. तर सुट्टी घेण्याच्या प्रमाणातही 25 टक्क्यांची घट झाली आहे.

फ्रान्स, न्यूझीलंडमधील काही कर्मचाऱ्यांनीही हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. सर्वाधिक काम करणाऱ्या देशांच्या यादीत गाम्बिया देशानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.भारतात एक कर्मचारी सरासरी 50 तास काम करतो. तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात सरासरी अंदाजे 47 तास काम केले जाते. भारतातही अनेक वर्षांपासून 4 वर्किंग डे या प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये उहापोह सुरु आहे. सरकार कंपन्यांना फ्लेक्सिबिलिटीसह आठवड्यात 4 दिवस काम 3 दिवस आराम देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : तुकाराम मुंढेंची दोन महिन्यांत आरोग्य खात्यातून उचलबांगडी, नव्या नियुक्तीच्या