हरियाणातील एका कालव्यात कार पडून चौघांचा मृत्यू, ३० तासांनंतर बाहेर काढली कार

हरियाणातील अंबाला येथील इस्माइलपूर येथून जाणाऱ्या नरवाना कालव्यात कार पडून चौघांचा मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. परंतु या घटनेची माहिती पोलिसांनी आज सायंकाळच्या दरम्यान मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता, यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेला एक दिवस पूर्ण होऊन आज दोन दिवस पूर्ण झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चौकशीला सुरूवात केली. अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली.

कारमध्ये दाम्पत्यासह दोन मुलांचे मृतदेह सापडले. 40 वर्षीय कुलबीर आणि त्याची पत्नी कमलजीत, 16 वर्षीय जश्नप्रीत कौर आणि 11 वर्षीय खुशदीप अशी दोन मुलांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर अंबाला सिटी सिव्हिल हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पाठवले.

फॉरेन्सिक तज्ञ डॉक्टर उद्या (मंगळवार) शवविच्छेदन करतील आणि त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. नातेवाईकांना कळविण्यात आल्याचे नागगल पोलिसांनी सांगितले. हे कुटुंब मारुती कारमधून नातेवाईकांकडे जात असताना हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या घटनेची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.


हेही वाचा : नवीन वर्षात एअर इंडियात दाखल होणार १२ विमाने; टाटा समूहाची घोषणा