घरदेश-विदेशसिलिगुडीच्या तिस्ता कॅनॉलमध्ये सापडली जिवंत स्फोटकं

सिलिगुडीच्या तिस्ता कॅनॉलमध्ये सापडली जिवंत स्फोटकं

Subscribe

सकाळी तिस्ता कॅनॉलजवळून जाणाऱ्या काही लोकांनी या मोर्टाल सेलला कॅनॉलमध्ये पाहिले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळावर पोलीस आणि बीएसएफने धाव घेऊन स्फोटकं जप्त केली.

पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये मोर्टाल सेल (जिवंत स्फोटकं) हस्तगत करण्यात आले आहेत. सिलीगुडीपासून ३० किलोमीटर अंतरावर फासीदेवा डोंगराजवळील तिस्ता कॅनॉलमधून ही स्फोटकं हस्तगत करण्यात आली आहे. आज सकाळी या कॅनॉलमधून चार मोर्टार सेल जप्त करण्यात आले आहे. याची माहिती मिळताच पोलीस आणि बीएसएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. पोलीस आणि बीएसएफकडून याचा तपास सुरु आहे.

- Advertisement -

४ मोर्टाल सेल जप्त

फासीदेवा स्टेशनचे अधिकारी सुजीत लामा यांनी सांगितले की, तपासानंतरच हे माहिती पडेल की हे मोर्टाल सेल कुठू आले आहेत. सकाळी तिस्ता कॅनॉलजवळून जाणाऱ्या काही लोकांनी या मोर्टाल सेलला कॅनॉलमध्ये पाहिले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. ज्याठिकाणी हे मोर्टाल सेल सापडले तो परिसर बांग्लादेशच्या सीमेजवळ येतो. या ठिकाणावरुन बीएसएफसह अनेक सुरक्षा एजन्सिचे येणे जाणे सुरुच असते. तिस्ता कॅनॉल सिक्किम येथून वाहत येतो. याठिकाणी आर्मीचे अनेक कॅम्प आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -