घरताज्या घडामोडीग्रेटर नोएडामध्ये रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू; 3 जखमी

ग्रेटर नोएडामध्ये रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू; 3 जखमी

Subscribe

रोडवेज बसने सात जणांना धडक दिल्याची धक्कादयक घटना ग्रेटर नोएडाच्या बादलपूर परिसरात घडली आहे. बादलपूर परिसरातील जीटी रोड हिरो मोटर्स कारखान्यासमोर रोडवेज बसने सात जणांना धडक दिली.

रोडवेज बसने सात जणांना धडक दिल्याची धक्कादयक घटना ग्रेटर नोएडाच्या बादलपूर परिसरात घडली आहे. बादलपूर परिसरातील जीटी रोड हिरो मोटर्स कारखान्यासमोर रोडवेज बसने सात जणांना धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. (four people killed in roadways bus collision in greater noida)

मिळालेल्या माहितीनुसार, बदायू डेपोची बस दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर बस चालकाने बसमधून पळ काढला. या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते कारखान्यातील कामगार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

सर्व कर्मचारी नाईट शिफ्टमध्ये (रात्री 12 वाजता) ड्युटी करण्यासाठी कारखान्यात जात असताना कारखान्यासमोर कर्मचारी पोहोचताच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बादलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरो मोटर्स कारखान्यातील कामगार त्यांच्या शिफ्टमध्ये गहाळ होते. त्याचवेळी बस क्रमांक UP 32 LN 3295 दादरीहून नोएडाच्या दिशेने जात होती. त्यावेळी बस चालकाकडून अनियंत्रित झालेल्या बसने रस्त्यावर चालणाऱ्या 7 जणांना धडक दिली.

या लोकांचा मृत्यू

- Advertisement -

1. संकेश्वर कुमार दास, वय 25 वर्षे, खाडिया पोलीस स्टेशन बरियारपूरमधील रहिवाशी, जिल्हा मुंगेर बिहार

2. मोहरी कुमार, वय 22 वर्षे, खारवा पोलीस स्टेशन रजान येथील रहिवाशी, जिल्हा बांका बिहार

3. सतीश, वय 25 वर्षे, कापुरी पोलीस स्टेशन मेजा येथील रहिवाशी

4. गोपाल स/ओ आझाद, वय 34 वर्षे, रहिवासी पटवारी का बाग गाव, अचेजा पोलीस स्टेशन, बादलपूर.

हे लोक जखमी

  • अनुज
  • धर्मवीर
  • संदीप

जखमींना उपचारासाठी निठारी येथे आणण्यात आले. तेथून सफदरजंग हॉस्पिटलला दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत. रोडवेज बस पोलिसांच्या ताब्यात आहे. चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा – अदानी पोर्ट्सचे 5000 कोटी पुढील आर्थिक वर्षात निकाली काढले जाणार; नेमकं प्रकरण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -