Covid 19 : फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट, देशभरात कर्फ्यू लागू!

Coronavirus India Updates 2,34,692 new COVID19 cases and 1,341 deaths in the last 24 hours
Coronavirus India Updates: चिंताजनक! सलग तिसऱ्या दिवशी २ लाखांहून अधिक रुग्णवाढ, एकाच दिवसात १,३४१ जणांचा मृत्यू

गेल्या ९ महिन्यांपासून जगात कोरोना ठाण मांडून बसला आहे. त्यातले ६ ते ७ महिने जगातले बहुतांश देश लॉकडाऊनमध्ये आहेत. गेल्या २ महिन्यांपासून हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात ही प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे फ्रान्समध्ये मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. यामध्ये फ्रान्समध्ये दिवसाला २० हजार कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे फ्रान्स सरकारनं तातडीनं कठोर पावलं उचलंत फ्रान्सच्या बहुतेक भागांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. यामध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस, लिऑन, मार्सेलिस आणि टोलोज या महत्त्वाच्या शहरांचा देखील समावेश आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘फ्रान्समध्ये सगळीकडे कोरोना पसरला आहे’, असं म्हणत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी कर्फ्यूसंदर्भात घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून फ्रान्समध्ये कर्फ्यू लागू असणार आहे.

फ्रान्समध्ये आजघडीला ७ लाख ५६ हजार ४७२ कोरोनाचे रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये त्यात दिवसाला किमान २० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. फ्रान्समधली पहिली लाट ओसरली, तेव्हा तिथली रुग्णवाढीची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. त्यामुळे फ्रान्स सरकारने देशात लागू असलेले निर्बंध उठवले होते. तसेच, बहुतेक व्यवहार सुरळीतपणे सुरू केले होते. मात्र, काही दिवसांतच फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा एकदा सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागला.

नाईट कर्फ्यू म्हणजे काय?

फ्रान्स सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून फ्रान्सच्या बहुतेक भागांमध्ये रात्री ९ ते सकाळी ६ या काळामध्ये पूर्णपणे संचारबंदी लागू असेल. या दरम्यान कुणाला अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचा असेल, तर त्यालाच परवानगी असेल, असं देखील सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. ‘आपण आता अशा टप्प्यात दाखल झालो आहोत, जिथे आपण तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे. हा व्हायरस फ्रान्समध्ये सगळीकडे पसरला आहे. पण त्यासोबतच फ्रान्समध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये सुरू असलेलं काम थांबायला नको. ते आपल्याला परवडणारं नाही. तरी कर्फ्यू काळात कुणाला वैद्यकीय उपचारांसारख्या अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची अट असेल’, असं मॅक्रोन यांनी म्हटलं आहे.

corona cases in world

कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर फ्रान्स क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत ८१ लाख ५० हजार ३८३ कोरोना रुग्ण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर भारत असून भारतात ७३ लाख ९ हजार १६४ कोरोनाबाधित आहेत.