CoronaVirus: फ्रान्समध्ये एकाच दिवशी ४९९ जणांचा मृत्यू!

आतापर्यंत फ्रान्स मधील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ हजार ३७५ इतकी झाली आहे. त्यापैकी ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला असून ९ हजार ४४५ जण रिकव्हर झाले आहेत.

coronavirus
कोरोना व्हायरस

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, स्पेन, अमेरिकानंतर फ्रान्समधील कोरोनाच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी फ्रान्समध्ये एका दिवसात ४९९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत फ्रान्समधील मृतांची संख्या ३ हजार ५२३ इतकी वाढली आहे. तर फ्रान्समधील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ हजार ३७५ इतकी झाली आहे. फ्रान्स मृतांच्या आकडेवारी चीन देखील मागे टाकले आहे. चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार ३१२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

फ्रान्समध्ये कोविड-१९चे २२ हजार ७५७ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यापैकी ५ हजार ५६५ अतिदक्षते खाली आहेत. हॉस्पिटलमध्ये जास्तकरून लोकांचा मृत्यू होत आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी जेरॉम सॉलोमन यांनी दिली.

जगभरात कोरोनामुळे इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची संख्या आहे. इटली मधील मृतांची संख्या १२ हजारहून अधिक झाली आहे. मंगळवारी इटलीमध्ये ८३७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ७९२ इतकी झाली होती. कोरोनामुळे इटलीनंतर स्पेनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ लाख ६४ हजार ७९९ झाली आहे. यापैकी ४२ हजार २८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ७६ हजार ४८० जण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – चीनपेक्षा ‘या’ देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू; जगभरातील मृत्यूचा आकडा ४२,१५१वर