घरटेक-वेकवोडाफोन-आयडिया फ्री कॉलिंग; जिओला फटका

वोडाफोन-आयडिया फ्री कॉलिंग; जिओला फटका

Subscribe

जिओकडून यापुर्वी ही सेवा मोफत देण्यात आली होती मात्र आता वोडाफोन-आयडिया आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंगची सुविधा देणार

कॉल टर्मिनेशन शुल्कासाठी असलेल्या कलमाच्या पुनरावलोकनाच्या अनिश्चिततेमुळे जिओने ग्राहकांना व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याने जिओच्या ग्राहकांना प्रतिस्पर्धी फोन नेटवर्कवर केलेल्या व्हॉईस कॉलसाठी प्रति मिनिट ६ पैसे आकारण्यात येणार आहेत. एकीकडे व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारणीचा निर्णय घेतल्यानंतर ग्राहकांना व्हॉईस कॉलसाठी आकारण्यात येणाऱ्या समान किंमतीचा डेटा विनामूल्य देण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन जिओने जाहीर केले आहे, असे असले तरी इतर कंपन्या देखील अशाच प्रकारचे व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारतील अशी शंका ग्राहकांमध्ये आहे.

मात्र या शंकेचे निरसन करणयासाठी या संदर्भातील मोठी घोषणा Vodaphone Idea limited ने गुरूवारी केली आहे. वोडाफोन, आयडिया आणि एअरटेल कंपन्यांची ट्विट करत आपल्या ग्राहकांना असे सांगितले की, ‘इतर प्रतिस्पर्धी फोन नेटवर्कवर फोन केल्यास IUC शुल्क आकारले जाणार नाही. तसेच तुम्हाला जे आश्वासन दिले होते त्याचा आनंद घ्या..’

- Advertisement -

दिवाळीपुर्वीच जिओने आपल्या ग्राहकांना मोठा दणका दिल्याने सगळीकडे जिओचीच चर्चा सुरू आहे. जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलल्याने कॉलिंगसाठी शुल्क आकारले जाणार आहे. जिओकडून यापुर्वी ही सेवा मोफत देण्यात आली होती मात्र आता वोडाफोन-आयडिया आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंगची सुविधा देणार आहे. या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग सुविधा देत त्यांना दिलासा दिला आहे. मात्र याचा फटका जिओला चांगलाच बसणार आहे.

- Advertisement -

असे म्हटले आहे जिओच्या प्रसिद्धी पत्रकात 

जिओच्या वतीने त्यांच्या ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी असंही सांगण्यात आले आहे की, हे आउटगोईंग शुल्क तात्पुरते आहेत. IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा नियम सांगतो. मात्र अन्य मोबाईल कंपन्यांनी हे शुल्क बंद केलेले नाही. त्यामुळे त्याचा फटका जिओला बसल्याचे कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Jio नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि 2G नेटवर्क असल्याने अन्य मोबाईल कंपन्यांचे ग्राहक जिओ ग्राहकांना मिस्ड कॉल देतात आणि जिओवरून त्यांना फुकट कॉल केला जातो, असे देखील जिओचे म्हणणे आहे. एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाचे ३५ ते ४० कोटी 2G ग्राहक रिलायन्स जिओ नेटवर्कवर दररोज किमान २५ ते ३० कोटी missed call देतात, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. इतर कंपन्यांना जिओ यासाठी १३,५०० कोटी रुपये मोजत आहे.

१ जानेवारी २०२० पासून हे IUC बंद होणार

जिओ ग्राहकांना केलेले (Jio to Jio free) कॉलिंग मात्र पूर्वीसारखं मोफत असणार आहे. आउटगोईंगवरचे ६ पैसे प्रतिमिनिट हे शुल्क तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, हे स्पष्ट करताना जिओने सांगितलं की, TRAI ने सांगितलेली टर्मिनेशन चार्जेस व्यवस्था लागू होत नाही, तो पर्य़ंत हे शुल्क लागेल. १ जानेवारी २०२० पासून हे IUC बंद होणार असल्याची माहिती आहे.


घ्या, आता Jio कॉलसाठी सुद्धा ग्राहकांना पैसे मोजावे लागणार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -