घरदेश-विदेशयोगी सरकारचा मोठा निर्णय! १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार मोफत Corona...

योगी सरकारचा मोठा निर्णय! १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार मोफत Corona Vaccination

Subscribe

उत्तर प्रदेशात वाढत्या कोरोना संक्रमण दरम्यान राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस सर्वांना विनामूल्य देण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर यूपी सरकारच्या मंत्रिमंडळानेही या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी रुग्णालयात मोफत लस

मंगळवारी मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधारण तासभर चालली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा मुद्दा प्रमुख असल्याने यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे बैठकीत १ मे पासून राज्यातील सरकारी रुग्णालयात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत कोरोना लस देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. परंतु ज्या व्यक्ती कोरोना लस घेण्यास सक्षम असतील ते या लसची किंमत देऊ शकतात. त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याचे आवाहनही सरकारने केले केले आहे.

- Advertisement -

देशात १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू

संपूर्ण देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जात गेली. त्यानंतर १ मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाली. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जातेय. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली. आता देशातील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे. यासंदर्भात सातत्याने देशात मागणी केली जात होती. आता हिच मागणी केंद्राने मान्य केली आहे. यामुळे देशातील कोरोना लसीकरणाचा आणखी वेग वाढणार आहे.

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -