घरदेश-विदेशवाह! क्या बात; कन्यारत्न झाल्याच्या आनंदात पाणीपुरीवाल्याने ५० हजार पाणीपुऱ्यांचे केले मोफत...

वाह! क्या बात; कन्यारत्न झाल्याच्या आनंदात पाणीपुरीवाल्याने ५० हजार पाणीपुऱ्यांचे केले मोफत वाटप

Subscribe

मुलगी झाल्याचा आनंद कित्येकांना झाल्याचे पाहिले आहे. यामध्ये कलाकार मंडळींसह अनेकांनी कन्यारत्न झाल्यावर त्यांनी त्यांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले. मात्र भोपाळमध्ये सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या पित्याने कन्येच्या जन्माचा आनंद असा काही साजरा केला की, सर्वच हैरान झाले आणि त्याच्या आनंदात सहभागी झाले. भोपाळमधील एका पाणीपुरीवाल्याला कन्या झाल्याने त्याने तब्बल ५० हजार पाणीपुऱ्याचे मोफत वाटप केले.

भोपाळमधील कोलार मार्गावर राहणाऱ्या आंचल गुप्ता या पाणीपुरी विक्रेत्याच्या कुटुंबात १७ ऑगस्ट रोजी कन्यारत्न जन्माली आली. मुलगी झाल्याच्या आऩंदात त्यांनी कोलार भागात राहणाऱ्या लोकांना ५० हजार पाणीपुरी मोफत खाऊ घातल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी त्याने पाच तास दहा स्टॉल लावले होते. लोकांनी त्याच्या आनंदात सहभागी होऊन रांगा लावून पाणीपुरीचा आस्वाद घेतला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता कुटुंबात जन्म झालेल्या मुलीचे नाव त्यांनी अनोखी असे ठेवले आहे. कन्येचा जन्म होण्याआधीच तिच्या स्वागताची तयारी आणि आगमनाचा आनंद कसा साजरा करायचा हे त्यांनी ठरवले होते. लग्नानंतर पहिले अपत्य मुलगी व्हावी अशी प्रार्थना देवाकडे केली होती. पहिला मुलगा झाला परंतु, दोन वर्षांनी आमच्या कुटुंबात मुलीचे आगमन झाले आहे, असे गुप्ता कुटुंबीयांनी सांगितले. यासह पत्नी आणि कुटुंबियासोबत चर्चा करून त्यांनी एक दिवस सगळ्यांना मोफत पाणीपुरी खाऊ घालण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले. गुप्ता हे मूळचे रायसेन देवरी येथील असून गेल्या १४ वर्षांपासून ते कोलार मार्गावर रहात आहेत. त्यांची पाणीपुरी चवीसाठी प्रसिद्ध आहे. रोज त्यांच्या दुकानात सुमारे पाच हजार पाणीपुरी विकल्या जातात. त्यामुळे मुलीच्या आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी रविवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते संध्याकाळी सहा वेळेत त्यांनी ५० हजार पाणीपुरी लोकांना मोफत खाऊ घातल्या.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -