घरताज्या घडामोडीSwiggyकडून फ्री होम डिलिव्हरी, फक्त ही अट पाळावी लागेल?

Swiggyकडून फ्री होम डिलिव्हरी, फक्त ही अट पाळावी लागेल?

Subscribe

तुम्ही जर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ Swiggyकडून ऑर्डर (Order) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऑनलाईन खाद्यपदार्थांची ऑर्डर आणि डिलिव्हरीची सुविधा देणाऱ्या स्विगी या प्लॅटफॉर्मने आपल्या मेंबरशिप प्रोगॅमशी संबंधित ग्राहकांसाठी अधिक सुविधा देण्यात येणार आहेत.

या प्रोगॅमशी संबंधित सदस्यांना १० किमीच्या परिसरातील सर्व रेस्टॉरंटमधून किमान १४९ रूपयांच्या ऑर्डर मोफत अनलिमिटेड डिलिव्हरी मिळेल, असं स्विगीने आपल्या नियंत्रणात म्हटलं आहे. तर स्विगी इन्स्टाग्रामवरील मेंबर विशेष ऑफर अंतर्गत हजाराहून अधिक प्रोडक्टर्सवर अधिक पैसे वाचवू शकतात, असं देखील कंपनीने म्हटलं आहे.

- Advertisement -

तीन महिन्यांसाठी २९९ तर १२ महिन्यांसाठी ८९९ रूपये भरावे लागणार

फळे, भाज्या, किड्स प्रोडक्ट, पर्सनल केअर आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या प्रोडक्टसचा यामध्ये समावेश असणार आहे. या प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांना तीन महिन्यांसाठी २९९ रूपये तर १२ महिन्यांसाठी ८९९ रूपये भरावे लागणार आहेत. कंपनी १५ ते ३० दिवसांसाठी ४९ रूपयांच्या निवडक सबस्क्रिप्शनसाठी स्विगी वन ट्रायल ऑफर करत असल्याचं स्विगीकडून सांगण्यात येत आहे.

फक्त ही अट पाळावी लागेल?

स्विगीने दिलेल्या माहितीनुसार, २ जूनपासून स्विगी मेंबर्सला फायदा मिळण्यास सुरूवात होणार आहे. यामध्ये जुन्या आणि नवीन अशा सर्व मेंबर्सचा समावेश असणार आहे २ जूनपासून स्विगीच्या मेंबर्स शिप मिळणार आहे. त्यामुळे २ जूनपासून ज्या मेंबर्सला ही मेंबर्सशीप मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा ग्राहकांना मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Zomato, Swiggy Down: भारतात झोमॅटो, स्विगी डाऊन, युजर्सचा संताप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -