घरट्रेंडिंगलस घेण्यासाठी 'या' दिवशी मिळणार Rapido टॅक्सीची फ्रि राईड

लस घेण्यासाठी ‘या’ दिवशी मिळणार Rapido टॅक्सीची फ्रि राईड

Subscribe

'राईड टू व्हॅक्सिनेट' या मोहिमेतंर्गत नागरिकांना सुरक्षित आणि कमी खर्चात वाहतूक

बाईक टॅक्सी (Bike Taxi) सर्विस असलेल्या रॅपिडो (Rapido) कंपनीने मोठी घोषणा केली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये राहणाऱ्या लोकांला लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी Rapido Bike Taxiची फ्रि राईड मिळणार आहे. १० जून ते २३ जून दरम्यान Rapido Bike Taxi ची फ्रि राईड देण्यात येणार आहे. (free Rapido taxi ride on 10 to 23 june to get vaccinated)  १८ वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना ही बाईक टॅक्सी सेवा फ्रिमध्ये मिळवता येणार आहे. ‘राईड टू व्हॅक्सिनेट’ (Ride to vaccinate)  असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. ‘राईड टू व्हॅक्सिनेट’ मोहिमेच्या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३१ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान जवळपास १० हजारांहून अधिक राईड फ्रिमध्ये देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

‘राईड टू व्हॅक्सिनेट’ या दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेत दिल्ली एनसीआरमधील नियुक्त केलेल्या १८ रुग्णालयांपैकी सर्व जवळच्या केंद्रावर जाण्यासाठी फ्रि राईड देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. Rapidoचे सह संस्थापक अरविंद सानका यांनी असे म्हटले आहे की, देशात सध्या सुरक्षित आणि आर्थिक हालचाली करण्याची गरज आहे. देशातील केवळ २० टक्के लोकांकडे स्वत:ची वाहने आहेत. ‘राईड टू व्हॅक्सिनेट’ या मोहिमेतंर्गत आम्ही नागरिकांना सुरक्षित आणि कमी खर्चात वाहतूक देणार आहोत. नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी कोणता अडथळा येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करु.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली असता दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्या आता कमी होत आहे. गेल्या २४तासात शुक्रवारी दिल्लीत २५० हून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण २४ जणांचा दिल्लीत मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी दिल्लीत ५०४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


हेही वाचा – Video: प्रियंका परिणीतीच्या Rain Dance वर फॅन्सीनी दिली मजेशीर प्रतिक्रिया

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -