घरदेश-विदेशआता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळणार मोफत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

आता विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळणार मोफत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Subscribe

देशात इयत्ता ६ वी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता मोफत पाठ्यपुस्तकं देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक यांनी घेतला आहे. नवोदय विद्यालय कार्यकारिणीची चाळीसावी बैठक पार पडली. या बैठकीतच देशातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात ईशान्य, हिमालयीन विभाग आणि जम्मू काश्मीरसाठी विशेष भरती मोहिम तसचं नववी नंतरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत औषधी गोळ्या देण्यासंदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. या नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रातील भरती नियमातही मोठ्या सुधारणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्याप्रमाणे देशातील वसतीगृहे आणि शाळांच्या सुधारणांसाठी सीएसआर(CSR) निधी जमा करण्यासंदर्भात आणि माजी विद्यार्थ्यांना शाळांना सुधारण्यासाठी सोयीसुविधा तसचं इतर गरजांकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. याबैठकीला द्रीय शिक्षण मंत्री डॉ.रमेश पोखरियाल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी, शाळांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्यानं सुधारणा देणे गरजेचं असल्याचे म्हंटल आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे योग्य ती खबरदारी घेत डिजीटल शिक्षणाचा प्रसार करुन याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं गरजेचंही त्यांनी सांगिलते.


हेही वचा- हिंदू महिला माहेरच्या व्यक्तीला संपत्तीचा वारस नेमू शकते

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -