Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: गुडन्यूज! उद्यापासून देशभरात मोफत लसीकरण; CoWIN Appवर नोंदणी करणे बंधनकारक...

Corona Vaccination: गुडन्यूज! उद्यापासून देशभरात मोफत लसीकरण; CoWIN Appवर नोंदणी करणे बंधनकारक नाही

लसीकरण खर्च उचलणार केंद्र सरकार

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. देशभरात उद्या २१ जूनपासून कोरोना लसीकरण मोफत होणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जूनला घोषणा केली. लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात १८ वर्षांवरील जास्त वय असलेल्या सर्व लोकांना निशुल्क लस दिली जाईल. याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

देशातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी देशभरात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. देशात उद्यापासून १९ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व लोकांना लस दिली जाईल. आता राज्यांना लस निर्माता कंपनींकडून डोस खरेदी करावे लागणार नाहीत. केंद्र सरकार डोस खरेदीकरून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देणार आहे.

- Advertisement -

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे नाकेनऊ झाले आहे. पण यादरम्यान लसीकरण ब्रह्मास्त्रच्या रुपात आहे. जगभरात कोरोना लसीकरणाचे काम सुरू आहे. भारतात आतापर्यंत ३० लाख लोकांना रोज लस दिल्या जात आहेत. येणाऱ्या दिवसात अजून लसीकरणाचा वेग वाढवला जाणार आहे.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून ते ३० एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने लस निर्मात्या कंपन्यांकडून १०० टक्के डोस खरेदी करून राज्यांना मोफत दिले गेले होते. या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स व ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली गेली. यानंतर १ मेपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यामध्ये केंद्राने ५० टक्के डोस खरेदी केल्या आणि उर्वरित राज्य आणि खासगी रुग्णालये यांनी थेट खरेदी केल्या.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ३.०६ कोटींहून अधिक कोरोना लसी उपलब्ध आहेत. येत्या तीन दिवसांत २४.५३ लाख डोस त्यांना दिले जातील.


हेही वाचा – Third Wave in India: CIIने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी दिला सल्ला; देशाला कसे अनलॉक करायचे? वाचा


- Advertisement -