Coronavirus: फ्रान्सचे माजी मंत्री पॅट्रिक डेव्हिडजियन यांचा कोरोनाने मृत्यू

फ्रान्सच्या पूर्वेकडील भागात कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. आता कोरोना उत्तर हाउतेस-डे-फ्रान्स आणि इतर भागात पसरत आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत २६०० लोक मरण पावले आहेत.

Patrick Devedjian
फ्रान्सचे माजी मंत्री पॅट्रिक डेव्हिडजियन यांचा कोरोनाने मृत्यू

फ्रान्सचे माजी मंत्री पॅट्रिक डेव्हिडजिन यांचे रविवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांमध्ये पॅट्रिक हे युरोपमधील सर्वात ज्येष्ठ नेता आहेत. पॅट्रिक डेव्हिडजिन यांनी गुरुवारी ट्विट करत, ‘मला कोरोनाची लागण झाली असून थकवा जाणवतोय, मात्र प्रकृती थोडी स्थिर आहे,” असे म्हटले होते. हौट्स-डे-सीन कौन्सिलचे अध्यक्ष असलेले पॅट्रिक बुधवारपासून रुग्णालयात होते. याआधी त्यांच्या प्रकृतीत कोणतीही समस्या नव्हती. डॉक्टरांनी त्यांना कोमामध्ये ठेवण्यात आले. मात्र, ते जास्त काळ जगू शकले नाहीत. शनिवारी त्यांची प्रकृती अधीक खालावली, असे कुटुंबाने सांगितले.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला येणार या चिंतेत जर्मन अर्थमंत्र्याची आत्महत्या


कोरोना विषाणूने जगभरातील देश हादरले आहेत. कोरोनोने उद्भवलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फ्रान्सने कोरोनाशी लढा देण्यासाठी लॉकडाउनची वेळ २ आठवड्यांनी वाढवली आहे, जेणेकरून कोरोनाचा प्रदुर्भाव रोखता येईल आणि आरोग्य यंत्रणेवर जास्त भार पडणार नाही.

फ्रान्सच्या पूर्वेकडील भागात कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. आता कोरोना उत्तर हाउतेस-डे-फ्रान्स आणि इतर भागात पसरत आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत २६०० लोक मरण पावले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाचे ४० हजार १७४ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ७ हजार २०२ जणांचा मृत्यू झाला आहे.