फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह १४ राष्ट्रप्रमुखांवर पेगॅससद्वारे पाळत

French President Emmanuel Macron
फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन

इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीचं पेगॅसस स्पायवेअरद्वारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह जगातील १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. दरम्यान, फ्रान्सने या प्रकरणाची चौकशी देखील सुरु केली आहे. पेगॅससचा वापर करुन भारतातील ४० पत्रकार आणि राजकीय नेते, अधिकाऱ्यांवर पाळत ठेवल्याचा दावा काही संस्थांनी केला. यानंतर देशात देखील या प्रकरणामुळे वातावरण तापलं आहे.

दरम्यान, भारतासह इतर देशातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे, असं अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितलं. तर हा सर्व प्रकार पॅरिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने उघडकीस आणला आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश असल्याचं ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटलं आहे.

मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या पेगॅससच्या हिटलिस्टवर

पेगॅसस स्पायवेअर हे लष्करी दर्जाचे आहे आणि हे प्रकरण १६ माध्यम संस्थांनी उघडकीस आणलं होतं. दरम्यान, २०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण पेगॅसस स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असा दावा ‘माँद’ने केला आहे.