घरCORONA UPDATECorona: कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीमुळे ७ व्या स्थानावर आला भारत

Corona: कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीमुळे ७ व्या स्थानावर आला भारत

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात आता १ लाख ८२ हजार १४३ इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर ५ हजार १६४ जणांचा मृत्यू यामुळे झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार भारत हा कोरोना संसर्गाच्या यादीत सातव्या स्थानावर असल्याचे पाहायला मिळत होते. यापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता.

इटली, फ्रन्स पाठोपाठ भारत

जॉन हॉपकिन्स कोरोना व्हायरस ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, भारतात १ लाख ८९ हजार ७६५ कोरोनाबाधित झाले असून जगभरात कोरोना संसर्ग यादीत तो सातव्या स्थानावर आला असल्याची नोंद आहे. तर इटली ही २ लाख ३३ हजार ०१९ आणि त्यानंतर फ्रान्स ही १ लाख ८८ हजार ७५२ कोरोनाबाधितांसह भारताच्या पुढे आहेत. दरम्यान, काल सायंकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ८ हजार ३८० नव्या कोरोनाबाधितांचा समावेश झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होणाऱ्यांचाही आकडा वाढतोय 

सध्या देशात ८९ हजार ९९५ अॅक्टीव्ह केसेस आहेत. तर ८६ हजार ९८३ जण आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर एक रुग्ण बरा होऊन देशाबाहेर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीमध्ये, आतापर्यंत साधारण ४७.७६ टक्के रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४ हजार ६१४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात काल २ हजार ४८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ६५५ झाली आहे. तसेच ८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २ हजार २८६ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे १ हजार २४८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने राज्यात आजपर्यंत २९ हजार ३२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

हेही वाचा –

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरुच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -