१ ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार अधिक शुल्क; वाचा सविस्तर

१ ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार अधिक शुल्क

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आदेशानंतर १ ऑगस्टपासून बँक एटीएमवर इंटरचेंज चार्जमध्ये २ रुपयांची वाढ होणार आहे. जूनमध्ये आरबीआयने प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी (Financial Transaction) इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपयांपर्यंत आणि बिगर आर्थिक व्यवहारासाठी (Non-Financial Transaction) ५ रुपयांवरून ६ रुपयांपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली होती. इंटरचेंज शुल्क हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटवर प्रक्रिया करणार्‍यांना बँकांकडून आकारले जाणारे शुल्क असणार आहे. सुधारित नियमांनुसार ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करता येणार आहेत. इतर बँकांचे एटीएम वापरुन ग्राहक मेट्रो शहरांमध्ये तीन आणि मेट्रो शहर नसलेल्या शहरांमध्ये पाच विनामूल्य एटीएम व्यवहार करू शकतील.

RBI ने स्थापन केली ९० कोटींची समिती

रिझर्व्ह बँकेने जून २०१९ मध्ये गठित समितीच्या सूचनांच्या आधारे हे बदल करण्यात आले आहेत. इंडियन बॅंक असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष व्ही.जी. कन्नन यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने एटीएम व्यवहारांच्या इंटरचेंज रचनेवर लक्ष देऊन एटीएम शुल्काचा आढावा घेतला असल्याचे सांगतिले गेले.

रिझर्व्ह बॅंकेने असे म्हटले…

बँकांनी एटीएम बसविण्याच्या वाढत्या किंमती आणि बँक किंवा व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरद्वारे घेतलेल्या एटीएम देखभाल खर्च तसेच ग्राहक यांच्या सोयीसाठी संतुलन राखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन बँकांना शुल्क वाढविण्यास परवानगी देण्यात येईल, असे रिझर्व्ह बॅंकेने असे म्हटले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार ३१ मार्चपर्यंत देशात १,१५,६०५ ऑनसाईट एटीएम आणि ९७ हजार ९७० ऑफ-साइट टेलर मशीन्स आणि देशातील विविध बँकांनी जारी केलेल्या जवळपास ९० कोटी डेबिट कार्ड असल्याचेही सांगितले.