नवी दिल्ली : विज्ञानासोबतच अध्यात्म अशी जोड संपूर्ण जगात फक्त भारतातच दिसून येते. आजही आपण चंद्रावर पाऊल ठेवत असताही देशातील नागरिक देवाकडे या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली जात आहे. हीच आपल्या देशाच्या संस्कृतीची खरी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. दरम्यान चांद्रयान-3 च्या यशासाठी ऋषिकेशच्या परमार्थ निकेतनपासून अमेरिकेपर्यंत विशेष प्रार्थना आणि विधी आयोजित करण्यात आले आहेत. चांद्रयान-3 साठी भारताच्या विविध भागांमध्ये धार्मिक सोहळे आयोजित केले जात आहेत. (From Hrishikesh to Singapore, prayers poojaarchas homhavans and many more are being offered for the success of Chandrayaan3 )
केवळ भारतच नाही तर जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक चांद्रयान-3 च्या या ऐतिहासिक लँडिंगसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वोंग म्हणाले की, चांद्रयान- 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी आपण प्रार्थना करत आहोत. वोंग यांनी ट्वीट करत म्हटले की, चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी मी कोट्यवधी लोकांच्या प्रार्थनेत सामील आहे. इस्रोने आपल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, मिशन शेड्यूलवर आहे आणि सिस्टम देखील दररोज तपासले जाते.
हेही वाचा : तुम्हाला माहिती आहे RRR आणि Avatar चित्रपटांच्या बजेटच्याही कमी खर्चात पाठविले चांद्रयान-3!
सिद्धीविनायक मंदिरात होमहवन
महाराष्ट्रातील पुणे येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी हवन पूजा आणि महाआरती करण्यात आली आहे.तर ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनमध्येही विशेष गंगा आरती केली जात आहे. आरतीपूर्वी हवन पूजनही करण्यात आले. भुवनेश्वर, वाराणसी आणि प्रयागराजमध्ये चांद्रयान-3 साठी हवन पूजा देखील केली जात आहे. अलीगढमधील एका हनुमान मंदिरात काही भक्त जमून पूजा-आरती करताना दिसले. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्येही भाविकांनी मंत्रोच्चार केला.
हेही वाचा : चांद्रयान-3 यशस्वी होणारच, पण ‘या’ व्यक्तीचा विसर पडता कामा नये; आर माधवनची पोस्ट चर्चेत
येथे पहा यानाचे लॅंडींग
चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट संध्याकाळी 5:20 वाजता होईल. थेट प्रक्षेपण इस्रोच्या वेबसाइट, यूट्यूब चॅनल आणि डीडी नॅशनलवर दाखवले जाणार आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर, भारत चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरणार आहे.