घरताज्या घडामोडीभारतीयांनो! पुढील काही तास महत्वाचे, करोना स्टेज ३ मध्ये पोहचला की नाही...

भारतीयांनो! पुढील काही तास महत्वाचे, करोना स्टेज ३ मध्ये पोहचला की नाही कळणार

Subscribe

सध्या करोना व्हायरसचा फैलाव स्टेज २ वर आहे. यात करोनाचा संसर्ग फक्त स्थानिक लोकांपर्यंत मर्यादित आहे. पण जर करोना स्टेज ३ वर गेला तर तो अधिक आक्रमक होऊन देशभरात त्याचा सामुदायिसंसर्ग होऊ शकतो. जो भयंकर असेल. यामुळे पुढील काही तास भारतीयांसाठी महत्वाचे असल्याचा इशारा इंडिया कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ICMR संशोधकांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर येणारे काही तास देशवासियांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

ICMR चे संशोधक डॉक्टर आर आर गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २४ ते ३६ तासात करोनाने स्टेज ३ मध्ये प्रवेश केला की नाही ते काही तासातच कळणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी काही गणितीय सूत्रांवर आधारित संशोधन सुरू असल्याच गंगाखेडकर यांनी सांगितले आहे. जर करोना स्टेज ३ वर गेला तर त्यावर नियंत्रण करणे कठिण असल्याचं ICMR चे डॉक्टर बलरान भार्गव यांनी म्हटलं आहे. यासाठी सरकार जे आवाहन करत आहे त्याची जनतेने गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -