घरदेश-विदेशकॅनडामधील ७०० भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला, बोगस अॅडमिशनमुळे झाला पर्दाफाश

कॅनडामधील ७०० भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला, बोगस अॅडमिशनमुळे झाला पर्दाफाश

Subscribe

नवी दिल्ली : लाखो रुपये खर्च करून कॅनडाला अभ्यासासाठी गेलेल्या 700 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची व्हिसा एंजटकडून ‘ॲडमिशन ऑफर लेटर’ प्रकरणी फसवणूक झाल्याने कॅनडा सरकार विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत पाठवणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

कॅनडामधील 700 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांचे ‘ॲडमिशन ऑफर लेटर’ बनावट असल्याचे आढळल्याने तेथील अधिकाऱ्यांकडून भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाखो रुपये खर्च करुन या 700 विद्यार्थ्यांनी कॅनडाच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र कॅनडामध्ये गेल्यावर त्याचे ‘ॲडमिशन ऑफर लेटर’ बनावट असल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांना धक्काच बसला. या विद्यार्थ्यांना नुकतेच कॅनेडियन बॉर्डर सिक्युरिटी एजन्सी (CBSA) कडून मायदेशी परतण्याचा आदेश मिळाले आहेत.

- Advertisement -

एजंटने विद्यार्थ्यांकडून उकळले 20 लाख रुपये
जालंधर येथील एज्युकेशन मायग्रेशन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने 700 विद्यार्थ्यांनी स्टडी व्हिसासाठी अर्ज केला होता. एज्युकेशन मायग्रेशन सर्व्हिस सेंटरमधील ब्रिजेश मिश्रा नावाच्या एजंटने या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क आणि सर्व खर्चासह प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 16 लाख रुपयांहून अधिक रुपये घेतले होते. यामध्ये हवाई तिकीट आणि सुरक्षेसाठी जमा केलेल्या रकमेचा समावेश नाही. विमान तिकीट आणि त्याच्या सुरक्षेसाठी वेगळी रक्कमही आकारण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या एजंटला एकूण 20 लाख रुपये दिले होते.

विद्यार्थी 2018-19 मध्ये शिक्षणासाठी कॅनडाला गेले
जालंधरमधील सर्व विद्यार्थी 2018-19 मध्ये कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांनी कॅनडामध्ये परमनंट रेसिडेन्सीसाठी (PR) अर्ज केला तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. परमनंट रेसिडेन्सीसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थांचे ‘एज्युकेशन ऑफर लेटर्स’ची तपासणी करण्यात आली. यामध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे व्हिसा जारी केला याची तपासणी करण्यात आली. इमिग्रेशन अधिकार्‍यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशपत्रांची सत्यता तपासली असता त्यांना प्रवेशपत्र बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर ही बाब उघड झाली.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण, पण भविष्य…
कॅनडाला गेलेल्या ७०० विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करत वर्क परमिट मिळवले आहे. याशिवाय त्यांनी कामाचा अनुभव देखील मिळवला आहे. कॅनडामध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परमनंट रेसिडेन्सीसाठी अर्ज केला, तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. एवढी मोठी शैक्षणिक फसवणूक घडल्याची घटना कॅनडामध्ये पहिल्यांदाच समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -