Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भारत अनेक मोठ्या देशांना टाकणार मागे; PM मोदींचं 'हे' स्वप्न...

भारत अनेक मोठ्या देशांना टाकणार मागे; PM मोदींचं ‘हे’ स्वप्न येत्या 4 वर्षांत पूर्ण होणार, IMFकडून संकेत

Subscribe

2027-28 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, येत्या काही वर्षांत भारत जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि जागतिक विकासात देशाचे योगदान 15 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

नवी दिल्ली: भारतात आयोजित दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेला संपूर्ण जगाने यशस्वी घोषित केले आहे आणि देशाचं खूप कौतुक केले आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेसह सर्व जागतिक संस्थांनी मान्य केले आहे. G-20 मध्ये ज्या सदस्य देशांनी भारताच्या प्रस्तावांना एकापाठोपाठ एक सहमती दर्शवली, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका स्वप्नालाही या शिखर परिषदेत एक प्रकारे मान्यता मिळाली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… (G-20 India will leave many big countries behind PM Modi s dream will be fulfilled in next 4 years hints from IMF)

2047 पर्यंत भारत विकसित देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पाहिलेल्या स्वप्नाचा उल्लेख त्यांनी आणि त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांनी अनेक प्रसंगी केला आहे. यापैकी एक म्हणजे भारत 2047 पर्यंत जगातील विकसित देशांच्या यादीत भारत पोहोचणार आणि येत्या पाच-सहा वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल.

- Advertisement -

आज अर्थव्यवस्था वेगाने हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता तर जागतिक संस्थांनीही पंतप्रधान मोदींच्या या स्वप्नांवर आपल्या मान्यतेचा शिक्का मारला आहे. G-20 मध्ये सहभागी होण्यासाठी देशात आलेल्या भारतीय वंशाच्या IMFउपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे हे नाकारता येणार नाही.

चार वर्षांत भारत बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

2027-28 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, येत्या काही वर्षांत भारत जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि जागतिक विकासात देशाचे योगदान 15 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. मात्र, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी श्रमिक बाजारपेठेत सुधारणा, सुलभता यांवर तसंच, लोकांना बिजनेस करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर दिला पाहिजे. महिला श्रमशक्तीचा सहभागदेखील वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

6 टक्के वाढीचा अंदाज

- Advertisement -

गीता गोपीनाथ यांच्या मते, भारताबाबत जे आकडे समोर येत आहेत त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका घेण्याचे कारण नाही. त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था समाधानकारक गतीने प्रगती करत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 6 टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज व्यक्त करताना त्या म्हणाले की, हाच विकास कायम राखण्यासाठी आणि खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहेत. IMF च्या गीता गोपीनाथ यांनीच नव्हे तर भारताने उचललेल्या पावलांचे जगातील सर्व जागतिक संस्थांनी कौतुक केले आहे.

जपान आणि जर्मनीला मागे टाकणार भारत

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आधीच जाहीर केलेल्या अंदाजानुसार, 2027 मध्ये जपान आणि जर्मनीसारख्या देशांना मागे टाकून भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. 2014 ते 2023 या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक नवे टप्पे गाठले आहेत. 2014 मध्ये ते 10 व्या स्थानावर होते आणि आज ते जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. कोरोनाच्या काळात, जेव्हा जगातील सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या होत्या, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था या उद्रेकातून सावरली आणि अशी गती मिळवली की संपूर्ण जगाने भारताचं महत्त्व मान्य केलं.

(हेही वाचा: चंद्र-सूर्य झाला आता खोल पाण्यातील रहस्य उलगडण्याची तयारी; ‘समुद्रयान’ मोहिमेची चाचपणी सुरू )

- Advertisment -