नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेमधील पहिल्याच दिवशी पंतप्रधान आणि शिखर परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अफ्रिकन युनियनला जी-20 चे आजीवन सदस्य असणार असल्याची ही घोषणा होती. त्यामुळे आता जी-20 शिखर परिषदेच्या सदस्य संख्येत एकाने वाढ झाली आहे.(G-20 membership increased; Modi announced the African Union)
नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 च्या सर्व सदस्य देशांच्या सहमतीने जाहीर केले की, यानंतर आता आफ्रिकन युनियन जी-20 चा सदस्य असेल, केवळ सदस्यच नव्हे तर आफ्रिकन युनियन आता या परिषदेचे आमरण सदस्य असणार आहे हे विशेष. यावेळी आफ्रिकन युनियनचे हेड अजाली असोमानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतील. विशेष बाब म्हणजे भारताने मांडलेल्या या प्रस्तावाचे चीन आणि यूरोपीयन यूनियननेसुद्धा समर्थन केले आहे. आफ्रिकन युनियनला सदस्यत्व मिळाल्यामुळे आफ्रिकेमधील 55 देशांना याचा लाभ होणार आहे.
Spoke at Session 1 of the G20 Summit on the subject of One Earth. Highlighted the need to further human centric development, which is also something Indian culture has always emphasised on.
It is with a spirit of One Earth that India has worked on initiatives such as LiFE… pic.twitter.com/lVB2OoBioI
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023
सध्या जगात अविश्वासाचे संकट निर्माण झाले आहे
यावेळी आपल्या उद्घाटनीय भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरक्कोमध्ये झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या दुःखाच्या वेळी आम्ही सगळेजण मोरक्को देशासोबत आहोत. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, कोरोनानंतर जगात अविश्वासाचे संकट निर्माण झाले आहे. तर युद्धाने या संकटाला आणखी गडद केले आहे. तेव्हा जर आपण सर्व मिळून कोरोनाच्या संकटाला हरवू शकतो तर मग एकमेंकाशी संवाद ठेऊन आपण निर्माण झालेल्या अविश्वासाच्या संकटालाही मात देऊ शकतो, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र येऊन सोबत काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : G20 शिखर परीषदेसाठी मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून मराठमोळ्या युवकाकडे जबाबदारी
अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने दिला होता जगाला संदेश
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज आपण ज्या ठिकाणी जमलो आहोत तिथून काही किलोमीटर अंतरावर एक अडीच हजार वर्ष जुना स्तंभ आहे. त्यावर प्राकृत भाषेत लिहिले आहे की, मानवतेचे कल्याण नेहमीच केले पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने संपूर्ण जगाला हा संदेश दिला होता. 21व्या शतकातील हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा देणार आहे.
हेही वाचा : INDIA आघाडीत सहभागी झालेल्या ‘AAP’ ने मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये निवडणुकीसाठी थोपाटले दंड
पंतप्रधानांनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत
आज सकाळी जी-20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये पोहोचलेल्या परदेशी राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मिठी मारली आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना भारत मंडपममध्ये बांधलेल्या कोणार्क चक्राची माहिती दिली.