G20 Summit 2023: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. भारतात जगातील सर्वात शक्तिशाली देशांचे नेते एकाच ठिकाणी जमले आहेत. 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान G-20 शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत उपस्थित असलेले सर्व देश आर्थिक मुद्द्यांपासून सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. मात्र, दरम्यान, भारताने पाकिस्तानला G-20 परिषदेला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले नसल्याने पाकिस्तानची जनता नाराज आहे, आपल्या सरकारवर टीकास्त्र डागत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. (G 20 Our leaders are worthless Pakistanis angry at India s glory cursing leaders )
G-20 गटात एकूण 20 देशांचा समावेश आहे. या सर्व देशांचे प्रमुख भारतात पोहोचले आहेत. याशिवाय भारताने पाकिस्तानपासून वेगळे होऊन नवा देश स्थापन केलेल्या बांगलादेशसह इतर 9 देशांना पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण दिले आहे. बांगलादेश आण्विक देश नसतानाही जी-20 परिषदेत सहभागी होणार आहे आणि आण्विक देश असूनही पाकिस्तानला निमंत्रित करण्यात आले नाही, या गोष्टींची आता पाकिस्तानी नागरिकांना खूप लाज वाटत आहे.
पाकिस्तानी YouTuber शोएब चौधरी याने पाकिस्तानी नागरिकांना भारतात होणाऱ्या G-20 शिखर परिषदेबाबत त्यांचे मत विचारलं. यावर पाकिस्तानी म्हणाले की, आम्हाला खूप लाज वाटत आहे. भारताने आम्हाला शिखर परिषदेचे निमंत्रण दिलेले नाही.
भारतापासून वेगळे होऊन इस्लामिक देश बनलेल्या पाकिस्तानला आता पश्चाताप होत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आता त्याचा बळी ठरत असताना, भारत G-20 परिषदेचे आयोजन करत आहे. G-20 मध्ये सहभागी होण्यासाठी जगातील 19 मोठ्या अर्थव्यवस्थांचे नेते भारतात पोहोचले आहेत. G-20 हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा समूह आहे याची पाकिस्तानींना कल्पना नाही, पण त्यात आपला देश समाविष्ट नसल्याची खंत पाकिस्तानी जनता व्यक्त करत आहे.
त्यात सहभागी होण्यासाठी भारताने बांगलादेशसह अनेक देशांना आमंत्रित केले आहे. पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनल रिअल एंटरटेनमेंट टीव्हीने याबाबत लोकांशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की, पाकिस्तानची परिस्थिती अशी नाही की भारताने त्यांना निमंत्रित करावं. एक पाकिस्तानी म्हणाला की, आपला देश दिवाळखोर झालाय, तो कसा तरी चालतो आहे. तर एक पाकिस्तानी नागरिक म्हणाला, भारत आणि पाकिस्तान एकत्र येऊ शकत नाहीत. यासोबतच त्यांनी आणखी एक कारण देत आमच्या राजकारण्यांना मान मिळत नसल्याचे सांगितले. तसंच, देशात कोणी ताकदवर नेता असता तर त्याला बोलावलं असतं, असं तो म्हणाला.
G-20 गटात समाविष्ट देशांव्यतिरिक्त आणखी 9 देशांना विशेष निमंत्रणावर सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या देशांमध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे.
पाकिस्तानला निमंत्रित न करण्याचे कारण
भारताने पाकिस्तानला निमंत्रण न पाठवण्याचे कारण म्हणजे भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध चांगले नाहीत. पाकिस्तान नेहमीच भारताविरुद्ध नेहमीच दहशतवादी कारवाया करत असतो. 2008 मधील मुंबई हल्ला हे त्याचे उदाहरण आहे. याशिवाय तो देशाच्या जवानांना लक्ष्य करत असतो. पुलवामा हल्ला आणि उरी हल्ला ही त्याचीच उदाहरणे आहेत.
(हेही वाचा :G20India2023 : G-20मध्ये ‘भारता’ ने वेधले सर्वांचे लक्ष, आफ्रिकन युनियनला मिळाले कायम सदस्यत्व )