घर देश-विदेश G-20 शिखर परिषद: प्रवेशद्वारात शंख, भिंतींवर भारतीय संस्कृतीचं दर्शन; जाणून घ्या, भारत...

G-20 शिखर परिषद: प्रवेशद्वारात शंख, भिंतींवर भारतीय संस्कृतीचं दर्शन; जाणून घ्या, भारत मंडपमची दहा वैशिष्ट्य

Subscribe

Bharat Mandapam Photos: नवी दिल्ली येथे होणारी G-20 शिखर परिषद नुकत्याच बांधलेल्या भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आली आहे. भारत मंडपम हे अनेक तंत्रज्ञानाने भव्य बनवण्यात आले आहे. बघूया कसं आहे भारत मंडपम?

भारत मंडपम

- Advertisement -

G-20 शिखर परिषदेशी संबंधित कार्यक्रम भारत मंडपममध्येच आयोजित केले जातील. G-20 साठी ते अतिशय सुंदरपद्धतीने सजवले गेले आहे आणि जगभरात भारताचा गौरव होत आहे. (G 20 Summit Conch at entrance Indian culture on walls Know ten characteristics of Bharat Mandapam )

ITPO मध्ये बांधलेले हे नवीन कॉम्प्लेक्स जगातील टॉप 10 कन्व्हेन्शन सेंटर्सपैकी एक आहे. जे जर्मनीच्या हॅनोव्हर आणि चीनच्या शांघायसारख्या प्रसिद्ध कन्व्हेन्शन सेंटरशी टक्कर देतं.

- Advertisement -

भारत मंडपम
भारत मंडपम

भारत मंडपम 123 एकरांवर बांधण्यात आला आहे आणि या बांधकामावर सुमारे 2700 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

भारत मंडपम
भारत मंडपम

देशातील या सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 10,000 लोक बसण्याची क्षमता आहे. हे सेंटर तीन मजल्यांमध्ये बांधण्य़ात आले आहे.

(हेही वाचा: “ओबीसी ‘ए’ आणि ओबीसी ‘बी’ विभागणी करून मराठा आरक्षण द्यावे”, वडेट्टीवारांचा सरकारला सल्ला )

भारत मंडपम
भारत मंडपम

भारत मंडपममध्ये मोठे हॉल, अॅम्फी थिएटर तसेच,अनेक बैठक खोल्या आहेत. ते किती भव्य आहे याची कल्पना तुम्ही या चित्रांवरून करू शकता.

भारत मंडपम
भारत मंडपम

यात आधुनिक तंत्रज्ञानासह अनेक व्हीआयपी लाउंज आणि कॉन्फरन्स रूम देखील आहेत.

भारत मंडपम
भारत मंडपम

भारत मंडपमच्या तिसऱ्या मजल्यावर एकाच वेळी सात हजार लोक बसण्याची क्षमता आहे आणि थिएटरमध्ये 3 हजार लोक एकत्र बसू शकतात. तंत्रज्ञानासोबतच व्हीआयपींच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -