घर देश-विदेश G-20 Summit : मोदी सरकारच्या 'भारत'ला विरोधकांचा आक्षेप, काँग्रेस नेते जयराम रमेश...

G-20 Summit : मोदी सरकारच्या ‘भारत’ला विरोधकांचा आक्षेप, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणतात…

Subscribe

दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरच्या निमंत्रण पत्रात इंडियाचे राष्ट्रपती असं लिहिण्याऐवजी 'भारताचे राष्ट्रपती' असे लिहिले आहे. जयराम रमेश यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

नवी दिल्ली: गुलामगिरीची मानसिकता आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी बदलण्यासाठी मोदी सरकार सतत काम करत आहे. या मालिकेत केंद्र सरकार आता राज्यघटनेतून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्याचा विचार करत आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही पण यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. (G-20 Summit Opponents object to Modi government s India Congress leader Jairam Ramesh says that soon Our Nation Name will change it will be Bharat)

दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरच्या निमंत्रण पत्रात इंडियाचे राष्ट्रपती असं लिहिण्याऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले आहे. जयराम रमेश यांनी त्यांच्या X हँडलद्वारे लिहिले की, ‘ ही बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरसाठी ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताच्या राष्ट्रपती’च्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. आपल्या ट्वीटमध्ये जयराम रमेश म्हणाले की, संविधानाच्या आर्टिकल 1 नुसार, भारत जो इंडिया आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु, आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे.

- Advertisement -

प्रमुख राजकीय पक्षांचा ‘जमापुंजी’ आली समोर; भाजपच्या संपत्तीत झाली ‘भरघोस’ वाढ

- Advertisement -

काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या दाव्यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, प्रत्येकजण भारतावर प्रेम करतो आणि प्रत्येक देशवासी भारत या नावावर प्रेम करतो. आता ज्यांचं भारतावर प्रेम नाही ते यावर प्रश्न उपस्थित करतील.

आरएसएस प्रमुखांचे आवाहन

अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका सभेला संबोधित करताना शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत असल्याचे म्हटले होते. इंडियाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्याचे आवाहनही त्यांनी केलं होतं.

18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र, या अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत कोणतीही विशेष माहिती अद्याप समोर आलेली नाही. चांद्रयान-३ आणि आदित्य एल-१ मोहिमेसह अलीकडच्या यशावरही विशेष सत्रात चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजप खासदारानेही केली होती मागणी

विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही भाजपचे राज्यसभा खासदार नरेश बन्सल यांनी ‘इंडिया’ शब्दाऐवजी ‘भारत’ शब्द वापरण्याची मागणी केली होती. नरेश बन्सल म्हणाले होते की, ‘इंडिया’ हा शब्द गुलामगिरी आणि वसाहतवादी गुलामगिरीचे प्रतीक आहे. दुसरीकडे, 25 जुलै रोजी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडी I.N.D.I.A. टार्गेट केले आणि सांगितले की ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना इंग्रजांनी केली होती.

(हेही वाचा: प्रमुख राजकीय पक्षांचा ‘जमापुंजी’ आली समोर; भाजपच्या संपत्तीत झाली ‘भरघोस’ वाढ )

- Advertisment -