घर देश-विदेश G-20 शिखर परिषदेचे सूप वाजले; अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझिलकडे सुपूर्द

G-20 शिखर परिषदेचे सूप वाजले; अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझिलकडे सुपूर्द

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-20 चे अध्यक्षपद ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवले.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेचे सूप वाजले असून, भारताने अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझिल देशाकडे सोपवली आहेत. तेव्हा पुढील जी-21 शिखर परिषद ही ब्राझिलमध्ये होणार आहे.(G-20 summit soup rang; Presidency handed over to Brazil)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-20 चे अध्यक्षपद ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवले. यादरम्यान त्यांनी सिल्वा यांना पारंपारिक गिव्हल दिला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी नवीन जागतिक रचनेत जगाचे नवीन वास्तव प्रतिबिंबित करण्याचे आवाहन केले आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. तर पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आता जग बदलत आहे. तेव्हा या जगालतील काही महत्वाच्या संस्थानाही बदलण्याची गरज आहे. यूएनएससीमध्ये आता जेवढे सदस्य आहेत ते की जे स्थापनेवेळी होते. तेव्हा याचा विस्तार होण्याची गरज असून, यामध्ये आणखी काही देशांना सदस्यत्व देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा : इंडिया माता की जय म्हणायला चांगले वाटते का? फडणवीसांचे अमरावतीत वक्तव्य

पंतप्रधान मोदींनी केली परिषेदेच्या समाप्तीची घोषणा

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या समाप्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पुढील नोव्हेंबर महिन्यांपर्यंत भारताकडे जी-20 चे अध्यक्षपद जरी राहत असले तरी आज त्यांनी पुढील शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझिलकडे दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुम्ही आम्हाला या दोन दिवसांत मोलाचे मार्गदर्शन केले अनेकांनी प्रस्तावसुद्धा मांडले. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा आम्ही बारकाईने अभ्यास करून त्यावर काम करण्याच प्रयत्न करू, तर आमचा एक प्रस्ताव आहे की, नोव्हेंबरमध्ये जी-20 ची व्हच्युअल बैठक घेऊ म्हणजे या परिषदेत चर्चिल्या गेलेल्या विषयावर मंथन करून आपण कसे पाऊले टाकली याचे अवलोकन करता येईल असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : शाहरूखच्या ‘जवान’चे संसदेत स्क्रीनिंग कराल का? कॉंग्रेस नेत्याचा सरकारला सवाल

ब्राझिलने केली भारताची प्रशंसा

यावेळी ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लूला डी सिल्वा यांनी भारताच्या आर्थिक विकासावर बोट ठेवत करत असलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. तर ब्राझिल पुढील नोव्हेंबर महिन्यांपर्यंत जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार होईल. तर आगामी काळात गरीब देशांच्या कर्जाच्या समस्येवरही उपाय योजना केल्या पाहीजे असेही ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष यावेळी म्हणाले.

- Advertisment -