घर देश-विदेश G-20 : दहशतवाद आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोकादायक; शिखर परिषदेतील सूर

G-20 : दहशतवाद आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोकादायक; शिखर परिषदेतील सूर

Subscribe

राजधानी दिल्लीत जी-20 शिखर परिषद सुरू असून, जगभरातील अनेक नेते या परिषदेत सहभागी झाले आहे. या परिषदेत सहभाजी झालेले नेते विविध विषयांवर चर्चा करीत आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जी-20 शिखर परिषद सुरू असून, जगभरातील अनेक नेते या परिषदेत सहभागी झाले आहे. या परिषदेत सहभाजी झालेले नेते विविध विषयांवर चर्चा करीत आहेत. यामध्ये सर्वाधिक ज्वलंत असलेल्या दहशतवाद या विषयावरसुद्धा चर्चा झाली असून, शिखर परिषदेत सहभाजी झालेल्या सगळ्या नेत्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.(G-20 : Terrorism a threat to international peace; Tunes at the summit)

शिखर परिषदेत चर्चील्या गेलेल्या विषयाबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, जी-20 नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आणि दहशतवाद आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे असे मत व्यक्त केले आहे.

सर्वसमावेशक विकासाच्या घोषणेवर सहमती

- Advertisement -

यावेळी बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माहिती दिली की, जी-20 मध्ये सहभागी नेत्यांनी शाश्वत, मजबूत आणि सर्वसमावेशक विकासाच्या घोषणेवर सहमती दर्शविली आहे. एस. जयशंकर पुढे म्हणाले की, ही आमच्यासाठी आपली संस्कृती, परंपरा आणि वारसा दाखवण्याची संधी होती. जी-20 हे भू-राजकीय आणि सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्याचा मंच नाही हे लक्षात घेऊन ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात हे नेत्यांनी ओळखले असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा : विदेशी पाहुण्यांसमोर गरिबिला झाकण्याची काहीएक गरज नाही; राहुल गांधींचा सरकारवर प्रहार

आफ्रिकन युनियनला मिळाले सदस्यत्व

- Advertisement -

यावेळी बोलताना एस.जयशंकर म्हणाले की, आफ्रिकन युनियनला आज भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 चे स्थायी सदस्यत्व देण्यात आले आहे. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला संदेश आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी-20 मध्ये 20 सदस्य देश, नऊ आमंत्रित देश आणि 14 आंतरराष्ट्रीय संघटनानी सहभाग घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा : G-20 मध्ये देशाचे नाव BHARAT : प्रथमच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात INDIA नाव गायब

युक्रेन युद्धावरही झाली चर्चा

एस. जयशंकर म्हणाले की, परिषदेत सहभागी नेत्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि त्याचा परिणाम, विशेषत: विकसनशील आणि कमी विकसनशील देशांवर चर्चा केली, जे अजूनही साथीच्या आजारातून आणि आर्थिक व्यत्ययातून सावरत आहेत. अन्न, इंधन आणि खते हे विशेष चिंतेचे विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -