नवी दिल्ली : 18 वी G-20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. परिषदेत 19 देशांचे राज्य आणि सरकार प्रमुख सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 30 हून अधिक हॉटेल्स बुक करण्यात आल्या आहेत जिथे विविध देशांचे प्रतिनिधी मुक्कामाला असणार असून, यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचासुद्धा समावेश असणार आहे.(G20 Summit: Capital Delhi dressed like a bride; The President of the United States will stay)
या आठवड्यात नवी दिल्ली येथे G-20 शिखर परिषद होणार आहे. भारतासाठी ही मोठी संधी असेल कारण देशाला प्रथमच अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. यात अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटनसह 19 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी देशाची राजधानी नवरीसारखी सजवली जात आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ठोस व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय 30 हून अधिक हॉटेल्स बुक करण्यात आल्या आहेत. जिथे जगभरातील पाहुणे राहतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेथे मुक्काम करणार त्या हॉटेल्सचे एका रात्रीचे भाडे आठ लाख रुपये असणार आहे.
काय असते G-20 परिषद ?
G-20 हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचे एक आंतर-सरकारी असे व्यासपीठ आहे. भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा भाग आहेत. तर भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी इंडोनेशियाकडून यावेळी G-20 चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे.
हेही वाचा : अजितदादा सत्तेतून बाहेर पडा; मराठा आंदोलकांच्या बारामतीत घोषणा, सरकारला ‘हा’ इशारा
आंतरराष्ट्रीय संस्थासह प्रादेशिक संस्था होणार सहभागी
18 वी G-20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. यामध्ये 19 देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकार प्रमुख सहभागी होणार आहेत. याशिवाय युरोपियन युनियनही या परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच G-20 बैठकीत नऊ देशांचे प्रमुख पाहुणे देश म्हणून सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था आणि प्रादेशिक संस्था या आंतरराष्ट्रीय संस्थांव्यतिरिक्त G-20 चे अध्यक्ष म्हणून भारतातील आयएसए (ISA), सीडीआरआय (CDRI) आणि एडीबीचे (ADB) चे पाहुणे आमंत्रित केले आहेत.
हेही वाचा : Chandrayaan-3 : आता इस्रो चंद्रावर मानव पाठवू शकणार; विक्रम लँडरचा प्रयोग यशस्वी; नवी अपडेट समोर
येथे थांबणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाहुणे
दिल्लीत येणाऱ्या विविध देशांचे प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर पाहुण्यासाठी दिल्लीतील हॉटेल्स बुक करण्यात आल्या असून, त्याची संख्या 30 एवढी आहे. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्लीत येत आहेत. ते 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर असतील. जो बायडन आयटीसी मौर्य शेरेटन या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर सीक्रेट सर्व्हिस कमांडो तैनात करण्यात आले आहे. जो बायडन यांना 14 व्या मजल्यावर त्यांच्या खोलीत नेण्यासाठी एक विशेष लिफ्ट बसवली जाणार आहे. ज्या रुममध्ये बायडन राहणार आहेत. ते या हॉटेलमधील सर्वात महागडे सूट आहे. ‘चाणक्य’ असे स्वीटचे नाव आहे. त्याचे एका रात्रीचे भाडे 8 लाख रुपये आहे.