नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी20 शिखर परिषदेत अनेक देशांच्या फर्स्ट लेडी सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिखर परिषदेच्या पहिल्या रात्री सर्व परदेशी पाहुण्यांसाठी शाही स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यात सहभागी झालेल्या विदेशी महिलांना भारतीय पेहरावाने भुरळ घातल्याचे दिसले.
It was a pleasure to host the Heads of delegations of G20 nations, Guest countries and International Organisations at the magnificent Bharat Mandapam for the G20 Summit Gala Dinner. pic.twitter.com/QKPdHVS6LU
— President of India (@rashtrapatibhvn) September 9, 2023
शाही डिनरमध्ये सहभागी झालेल्या अनेक विदेशी महिला भारतीय पेहरावात आल्या होत्या. काही महिलांनी साडी नेसलेली, तर काही महिला सलवारसूटमध्ये दिसल्या. जी20 स्नेहभोजनात सहभागी होण्यासाठी भारत मंडपममध्ये मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि त्यांची पत्नी कोबिता आले होते. यावेळी कोबिता यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
हेही वाचा – G-20 शिखर परिषदेचे सूप वाजले; अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझिलकडे सुपूर्द
भारत मंडपम येथे आयोजित डिनरला जपानचे राष्ट्राध्यक्ष फुमियो किशिदा आणि पत्नी युको किशिदा हे देखील उपस्थित होते. यावेळी जपानच्या फर्स्ट लेडी युको यांनी हिरव्या आणि गुलाबी साडी नेसली होती. भारत मंडपम येथे आयोजित डिनर कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांचे स्वागत केले. यावेळी क्रिस्टालिना भारतीय सलवारसूटमध्ये दिसल्या.
जी20मध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत मंडपम येथे आयोजित डिनरला हजेरी लावली. यावेळी त्यांनी साडी नेसली होती. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा त्यांच्या पत्नी रितू बंगा हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी रितू बंगा यांनी देखील साडी परिधान केली होती. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती हेही स्नेहभोजनासाठी निमंत्रित होते. यावेळी अक्षताने इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता.
हेही वाचा – भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान…, अक्षरधाम मंदिराच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांच्या भावना
आयएमएफच्या उपव्यवस्थापकीय संचालिक गीता गोपीनाथ यांनी निळ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची पत्नी इरियाना यांनीही जी20 बैठकीच्या डिनर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी इरियाना या भारतीय सलवारसूटमध्ये होत्या.