घरताज्या घडामोडीगडचिरोली : जहाल नक्षलवादी दाम्पत्यास अटक

गडचिरोली : जहाल नक्षलवादी दाम्पत्यास अटक

Subscribe

जहाल नक्षलवादी आणि टिपगड दलमचा कमांडर दयाराम अंकलू बोगा उर्फ यशवंत याला पत्नी शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नेताम हिच्यासह अटक करण्यात आली आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानास आज मोठे यश मिळाले आहे. जहाल नक्षलवादी आणि टिपगड दलमचा कमांडर दयाराम अंकलू बोगा उर्फ यशवंत (३५) याला पत्नी शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नेताम (३२) हिच्यासह अटक करण्यात आली आहे.

जहाल नक्षली बौगा हा सॅन २००९ मध्ये टिपागढ दलममध्ये भरती होऊन नक्षलमध्ये सामील झाला होता. सध्या तो टिपागढ दलमच्या डीव्हीसीएम या पदावर कार्यरत होता. तसेच त्याच्या नावावर गडचिरोली पोलीस स्टेशनला ७८ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. यामध्ये ६ पोलिसांसह १८ खून तर १० जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

१६ लाखांचे बक्षीस

हत्तीगोटा, मरकेगाव, दादापूर वाहन जाळपोळ यांसह १ मे २०१९च्या जांभुळखेडा भुसुरूंग स्फोटातही त्याचा सहभाग होता. विविध ३५ नक्षलवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याची माहिती देणाऱ्यासाठी १६ लाखांचे बक्षिसही पोलिसांनी जाहीर केले होते. तर बोगाची पत्नी सुमित्रा नेताम (३२) हिच्यावर ३५ गुन्हे दाखल असून तिच्यावर २ लाखाचे बक्षिस होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.


हेही वाचा – धक्कादायक! कोरोनामुळे वडिलांचे निधन, मृतदेह पाहण्याचे मागितले ५१ हजार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -