बंगळुरू : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर गगनयान-1 ची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. भारताचे हे पहिलेच मिशन असेल ज्यामध्ये मानवाला अंतराळात पाठवले जाईल. या मोहिमेचे तीन टप्पे असतील ज्यामध्ये दोन वेळा मानवरहित उड्डाणे पाठवली जातील आणि त्यानंतर एका उड्डाणात मानवाला अवकाशात पाठवले जाईल. या मोहिमेत तीन अंतराळवीर पाठवले जाणार आहेत.(Gaganyaan Mission: After the success of Chandrayaan-3, now ISRO’s Gaganyaan Mission; A robot will be sent into space)
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी या मिशनबद्दल सांगितले की, गगनयान मोहिमेच्या चाचणीसाठी महिला रोबोट व्योमित्र पाठवण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चाचणी अंतराळ उड्डाणाचा प्रयत्न केला जाईल. महामारीमुळे गगनयान प्रकल्पाला विलंब झाला होता. भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. परंतु गगनयानाच्या फायनल मिशनआधी ट्रायल मिशन होणार आहे. गगनयानाच्या प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी तीन चाचणी मोहिमा केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील.
ही आहेत गगनयान मिशनची वैशिष्ट्य
गगनयान मिशनच्या यावर्षी दोन प्रारंभिक मोहिमा पाठवल्या जाणार आहेत. पहिली मोहीम पूर्णपणे मानवरहित असेल. गगनयान रॉकेट ज्या मार्गाने जाते त्याच मार्गावरून सुरक्षितपणे परतावे हे ठरवण्याचा त्याचा उद्देश आहे. त्याच्या यशानंतरच 2024 मध्ये मानवाला अवकाशात पाठवले जाणार आहे.
हेही वाचा : मुंबई- गोवा महामार्ग का रखडला? राज ठाकरेंनी सांगितले नेमके कारण…
दुसऱ्या मोहिमेत पाठविला जाणार रोबो
दुसऱ्या मोहिमेत व्योमित्र नावाचा महिला रोबो पाठवण्यात येणार आहे. व्योमित्र अंतराळवीरांप्रमाणे काम करणार. ते गगनयानचे क्रू मॉड्यूल वाचेल आणि आवश्यक सूचना समजेल. तसेच, ग्राउंड स्टेशनवर उपस्थित असलेल्या टीमशी संपर्क साधून बोलणार आहे. या मोहिमेच्या निकालामुळेच मानवाला अंतराळात जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
तिसऱ्या टप्प्यात दोन मानव
तिसऱ्या फ्लाइटमध्ये दोन माणसे पाठवली जाणार आहेत. हे लोक तीन दिवस अंतराळात राहतील. गगनयान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 400 किमी उंचीवर फिरेल. हवाई दलातील चार वैमानिकांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
हेही वाचा : इतर देशांना केवळ बाजारपेठच मानले तर… पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा
आवश्यक यंत्रणा श्रीहरीकोटात
विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले की, गगनयान मोहिमेत आम्ही चाचणी वाहनाचा वापर करून एस्केप सिस्टमची इनफ्लाइट अॅबॉर्ट चाचणी करणार आहोत. एस्केप सिस्टम हा गगनयानमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत चाचणी करायची आहे. सर्व कामे सुरू आहेत. व्हेईकल क्रोम मॉड्यूल, सर्व यंत्रणा श्रीहरिकोटा येथे पोहोचल्या आहेत.