घर देश-विदेश नेहरू वंशातील गांधीने मोदी सरकारला ‘चले जाव’चा संदेश दिला, संजय राऊतांची टीका

नेहरू वंशातील गांधीने मोदी सरकारला ‘चले जाव’चा संदेश दिला, संजय राऊतांची टीका

Subscribe

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास ठरावावर लोकसभेत भाषण केले. ते संपूर्ण देशाने पाहिले. ‘अध्यक्ष महोदय, भाजपातील माझे मित्र तणावाखाली आहेत, पण त्यांनी ‘टेन्शन’ घेऊ नये. आज मी त्यांच्या प्रिय अदानींवर बोलणार नाही.’ असे सुरुवातीला बोलून गांधी यांनी भाजपाची दांडीच उडवली. पुढील तासभर गांधी गडगडत राहिले व बरसत राहिले. 9 ऑगस्ट हा क्रांतिदिनाचा, ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या महात्मा गांधीकृत घोषणेचा दिवस. त्याच दिवशी नेहरू वंशातील एका गांधीने मोदी सरकारला ‘चले जाव’चा संदेश भारतीय संसदेत दिला, असा ‘रोखठोक’ घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा – ‘पहाटेच्या शपथविधीप्रमाणे अजित पवार परत फिरणार’; राऊतांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

‘चले जाव’ आंदोलनाशी, स्वातंत्र्य लढ्याशी काडीमात्र संबंध नसलेले लोक आज सत्तेवर आहेत व ते राहुल गांधींविरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देत होते. राहुल गांधी विचलित न होता आपले भाषण करीत राहिले. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी तावातावाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उभ्या राहिल्या; पण त्यांच्याकडे एक मिश्किल कटाक्ष टाकत राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. राहुल गांधींचा पराभव करून 2019 साली स्मृती इराणी निवडून आल्या, पण 2024 साली अमेठीची जनता चूक सुधारेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरात केला आहे.

देशाचे वातावरण बदलत आहे
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी, असे अनेकांचे आज मत आहे. प्रियंका गांधी यांच्याशी नरेंद्र मोदी यांना मुकाबला करावा लागेल व निकाल काय लागेल ते कोणीच सांगू शकणार नाही. मोदी हे गुजरात व वाराणसी अशा दोन मतदारसंघांतून निवडणुका लढवतील, पण वाराणसी त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही. देशाचे वातावरण आणि वारे पूर्ण बदलत आहे, असे खासदार राऊत यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राहुल गांधींना पाहताच…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने संसदेतून काढले. त्यासाठी गुजरातच्या भूमीवरील न्याययंत्रणा व कायद्याचा गैरवापर केला. तेच राहुल गांधी सरकारवरील अविश्वास ठरावाच्या वेळी संसदेत पोहोचले. एखाद्या वीराप्रमाणे त्यांचे स्वागत झाले. अविश्वास ठरावावर ते खणखणीत बोलले. तेव्हा भाजपा सदस्यांनी फक्त गोंधळ घालण्याचेच काम केले. राहुल गांधी हे आदल्या दिवशी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पोहोचले. सोबत सोनिया गांधी होत्या. मध्यवर्ती सभागृहात बसलेले भाजपाचे सदस्य तेव्हा पळून गेले. राहुल गांधी जवळ आले व त्यांनी हस्तांदोलन केले तर ‘वर’पर्यंत वृत्त जाईल व नोकरी गमवावी लागेल, हे भय आज दिल्लीत सर्वत्र आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

मोदी-शहांच्या मुठीतून सत्तेची वाळू सटकतेय
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुठीतून सत्तेची वाळू सटकत आहे. 2024पर्यंत त्यांची मूठ रिकामी झालेली असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. देशाचे मोठेपण कशात असते, ते देशाची लोकसंख्या, उंच इमारती, महागड्या गाड्या यावर ठरत नसते. ते राज्यकर्त्यांचे चारित्र्य व स्वातंत्र्याविषयी त्यांच्या मनात किती आदराचे स्थान आहे, यावर ठरत असते. आज ते मोठेपण राहिलेले नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले.

- Advertisment -