घरताज्या घडामोडीgandhi jayanti: महात्मा गांधी स्वतः कसा साजरा करायचे जन्मदिवस, वाचा

gandhi jayanti: महात्मा गांधी स्वतः कसा साजरा करायचे जन्मदिवस, वाचा

Subscribe

देशभरात २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा (gandhi jayanti) केला जातो. यानिमित्ताने सरकार आणि गांधीवादी संस्थांच्याद्वारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वच्छतेपासून अहिंसेच्या धड्यांपर्यंत लोकं वेगवेगळ्या प्रकारे बापूंची आठवण काढतात. परंतु आज आम्ही तुम्हाला गांधी जयंती निमित्ताने गांधीची स्वतः कसा जन्मदिवस साजरा करायचे हे सांगणार आहोत.

गांधीवादी विचारवंत रामचंद्र राही यांच्यामते, गांधीजी आपल्या जन्मदिवस साजरा करत नव्हते, परंतु लोकं त्यांचा जन्मदिवस साजरा करायचे. त्यांनी १०० वर्षांपूर्वी गांधींच्या कथनांचा संदर्भ देते म्हणाले की, ‘१९१८ मध्ये गांधीजी आपल्या जन्मदिवस साजरा करणाऱ्यांना म्हणाले होते की, माझ्या निधनानंतर माझी चाचणी होईल की, मी वाढदिवस साजरा करण्यास पात्र आहे की नाही.’

- Advertisement -

जन्मदिनाच्या दिवशी बापू काय करायचे?

देशभरात पसरलेल्या गांधीवादी संस्थांची मातृ संस्था, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष रामचंद्र राही म्हणाले, ‘हा गंभीर दिवस असायचा. या दिवशी ते देवाची प्रार्थना करायचे. चरखा चालवायचे आणि जास्तीत जास्त मौन पाळायचे. कोणत्याही महत्त्वपूर्ण दिवस अशाच प्रकारे ते साजरा करायचे.’

१५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेकडून २ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंस दिवस म्हणून घोषित केला गेला. भारतात गांधी जयंती, प्रार्थना सभा आणि विशेष म्हणजे राजघाट नवी दिल्ली येथे गांधींच्या पुतळ्यासमोर श्रद्धांजली अर्पण करून साजरी केली जाती. यादिवशी राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात येते.

- Advertisement -

महात्मा गांधी यांच्या समाधीवर राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थितीत प्रार्थना आयोजित केली जाते, जिथे गांधींवर अंत्यसंस्कार झाले होते. यादिवशी त्यांचे आवडते भक्ती गीत रघुपती राघव राजा राम गायले जाते. हा दिवस संपूर्ण भारतात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -