Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Gandhi Maidan bomb blast : बिहारमधून फरार आरोपीला बेड्या, एसटीएफची कारवाई

Gandhi Maidan bomb blast : बिहारमधून फरार आरोपीला बेड्या, एसटीएफची कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : पाटणा येथील गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष कृती पथकाने (STF) एका आरोपीला अटक केली आहे. एसटीएफच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा बिहारमधील दरभंगाच्या अशोक पेपर मिल पोलीस स्टेशन हद्दीतील सिंदौली गावात छापा टाकला आणि या प्रकरणातील आरोपी मेहरे आलम याला अटक केली. आता त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात देण्यात येणार आहे. (Gandhi Maidan bomb blast case)

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 ऑक्टोबर 2013 रोजी गांधी मैदानावर सभा झाली. त्यांच्या या सभेसोबतच पाटणा जंक्शन येथे बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास 82 लोक जखमी झाले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केलेल्या तपासात मेहरे आलमचे नाव पुढे आले होते. एनआयएने त्याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे 29 ऑक्टोबर 2013 रोजी मुझफ्फरपूरमधील मीरपूर येथे एनआयएने छापा टाकला. पण एनआयएच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे संपूर्ण टीम मेहरे यांच्यासोबत मुजफ्फरपूरला परतली, तिथेच संपूर्ण टीम मेहरे याच्यासोबत सिद्धार्थ लॉजमध्ये थांबली होती. मात्र त्यावेळी एनआयएच्या पथकाला चकवा देऊन तो फरार झाला होता. एनआयएने 30 ऑक्टोबर 2013 रोजी मुझफ्फरपूर शहर पोलीस ठाण्यात मेहरे आलमविरोधात गुन्हा (612/13) नोंदवला.

मेहरे आलम हा गांधी मैदान आणि पाटणा जंक्शन येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोनूचा हस्तक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मोनू समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असून दरभंगा येथे राहून मोनू शिकत असे. तर, उर्दू भाषिक लायब्ररीत मेहरे आलम याची मोनूशी भेट झाली. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -