घरदेश-विदेशganesh chaturthi 2021 : बेकरी व्यावसायिकाने साकारला इको फ्रेंडली चॉकलेट बाप्पा, पाहण्यासाठी...

ganesh chaturthi 2021 : बेकरी व्यावसायिकाने साकारला इको फ्रेंडली चॉकलेट बाप्पा, पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात गणेशोत्सव सणावर अनेक निर्बंध लादण्यात आले, अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून यंदा सर्व सण साजरे करावे लागतील. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाईन दर्शनाने आवाहन केले आहे. तसेच गणेशोत्सव काळात प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

अशातच पंजाबमधील लुधियाना येथील एका बेकरी व्यावसायिकाने चक्क चॉकलेटचा बाप्पा साकारला आहे. या इको फ्रेंडली आकर्षक बाप्पाला पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. अनेकांसाठी हा चॉकलेट बाप्पा आकर्षणाचा विषय ठरतोय. हरजिंदर सिंह कुकरेजा असं चॉकलेटचा बाप्पा साकरणाऱ्या बेकरी व्यावसायिकाचं नाव आहे. त्यांच्या एका बेकरी कारागिरानं हा चॉकलेटचा गणपती साकारला आहे.

यावेळी बेकरी व्यावसायिक कुकरेजा यांनी सांगितले की, मागील ६ वर्षापासून चॉकलेटचा बाप्पा साकरत आहोत. इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केल्याचे कुकरेजा यांनी सांगितले,. तसेच पर्यावरणाला हानिकारक गणेश मूर्तींचा वापर कमी करावा असंही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी २२ सप्टेंबरला अमेरिका दौऱ्यावर, पहिल्यांदा घेणार बायडेन यांची भेट


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -