घरदेश-विदेशहरियाणात गणेश विसर्जनावेळी 7 जणांचा बुडून मृत्यू

हरियाणात गणेश विसर्जनावेळी 7 जणांचा बुडून मृत्यू

Subscribe

देशभरात एकीकडे गणपती विसर्जनाची धामधुम सुरु असताना दुसरीकडे हरियाणात मोठी दुर्घटना घडली आहे. हरियाणात गणपती विसर्जनावेळी विविध ठिकाणी 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात सोनीपतीमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाला, तर महेंद्रनगरमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

सोनपतमधील मिमारपूर घाटावर एक व्यक्ती मुलगा आणि पुतण्यासह गणपती विसर्जनासाठी आला होता. यावेळी विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, तिनही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी तपास सुरु आहे.

- Advertisement -

यात महेंद्रग़डमधील कनिना- रेवाडी मार्गावरील झगडोली गावाजवळील कालव्यावर गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी गेलेल्या सुमारे नऊ जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरा आठ जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र यातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महेंद्रगड येथील झगडोली गावाजवळ गणेशमूर्ती विसर्जनासाठी 20 ते 22 जण कालव्यावर आले होते. दरम्यान अनेक जण कालव्यात पडले. आत्तापर्यंत 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर 4 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. खट्टर म्हणाले की, महेंद्रगड आणि सोनीपत जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान कालव्यात बुडून अनेकांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी ह्रदयद्रावक आहेत. तर उत्तर प्रदेशातही गणपती विसर्जनावेळी झालेल्या एका दु:खद घटनेत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर उन्नावमधील रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला.


मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना- शिंदे गटात राडा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -