Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Ganeshotsav Guidelines 2021 : गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचा प्रभाव; जाणून घ्या राज्यनिहाय निर्बंध

Ganeshotsav Guidelines 2021 : गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचा प्रभाव; जाणून घ्या राज्यनिहाय निर्बंध

Related Story

- Advertisement -

देशभरात आजपासून गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. गणेश चतुर्थीचा हा उत्सव १० दिवस चालतो जो चतुर्थीला संपन्न होतो. मात्र, कोरोना संकटामुळे यंदाही गणेश उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाईल. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

महाराष्ट्रातील गणेशोत्सवावर कोरोनाचे निर्बंध

यावेळी मुंबईतील गणेश मंडळांमध्ये दर्शनाला परवानगी नाही. सर्वत्र कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यासह मिरवणुका काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे भक्तांना गणेशोत्सव काळात दर्शनासाठी मंडपामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. राज्याच्या गृह विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, यामुळे भक्तांना केवळ ऑनलाईन दर्शनाला परवानगी दिली जाईल. बीएमसीने घरगुती गणपतीच्या मूर्तींची उंची दोन फूट तर सार्वजनिक मंडळातील गणपतींच्या उंचीची मर्यादा चार फूट इतकी ठेवली आहे.

दिल्लीत सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध

- Advertisement -

राजधानी दिल्लीत आज गणेश चतुर्थीला सार्वजनिक ठिकाणी कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. डीडीएमएने लोकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता घरोघरी अत्यंत साध्यापद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. मात्र आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सर्व मंत्री सिग्नेचर ब्रिजजवळ यमुना किनारी गणपती बाप्पाच्या महाआरतीला उपस्थित राहतील.

उत्तर प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यास परवानगी नाही 

उत्तर प्रदेश सरकारने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्देश दिले की, ‘गणेश चतुर्थीचा सण लक्षात घेऊन सर्व आवश्यक तयारी करावी. या प्रसंगी स्थापित करण्यात येणाऱ्या मूर्तीची पूजा मंदिरात किंवा घरीच ठेवून केली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कोणताही मूर्ती बसवू नये. तसेच गणेश चतुर्थी सणामध्ये कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

कर्नाटकात तीन दिवस निर्बंधांतून सूट

- Advertisement -

कर्नाटक सरकारने गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यात पाच दिवस सार्वजनिक उत्सवांना परवानगी दिली होती. पण बेंगळुरू नागरी मंडळाने या सणाच्या निमित्ताने फक्त तीन दिवस निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मूर्तीच्या विसर्जनादरम्यान मिरवणूका काढण्याची परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी उत्सवाच्या वेळी मोठ्या संख्येने लोक जमतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लोकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करत घरातील बादल्यांमध्ये किंवा पालिकाच्या विसर्जन स्थळी नेऊ मूर्ती विसर्जित करावी.

तामिळनाडूमध्ये उत्सवाला परवानगी नाही

तामिळनाडूमध्ये गणेश चतुर्थीला कोणत्याही प्रकारच्या उत्सवाला परवानगी नाही. लोक गणशोत्सव फक्त त्यांच्या घरात साजरा करू शकतात. मात्र, तामिळनाडू सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी टीका केली आहे, केवळ हिंदू सणांवरच अशी बंदी का, असा सवाल भाजपने केला आहे.

आंध्र प्रदेशात गणेश चतुर्थीदरम्यान सर्व उत्सवावर बंदी 

आंध्र प्रदेशातही जगनमोहन सरकारने गणेश चतुर्थीदरम्यान सर्व उत्सवावर बंदी घातली आहे. टीडीपी आणि भाजपने या निर्णयाचा निषेध केला आहे आणि बंदी हटवण्याची मागणी केली आहे.


करदात्यांची चिंता मिटली! Income Tax Return दाखल करण्यासाठी मुदतवाढ


 

- Advertisement -