बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशातील मिरतमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न तिन जणांकडून करण्यात आला आहे.

Aunty sold her niece in 1.5 lakh
मामीकडून भाचीची दीड लाखात विक्री

उत्तर प्रदेशातील मिरतमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न तिन जणांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देखील दाखल केली आहे. बलात्कार पीडितेनं प्रकरणाबाबत नमतं घ्यावं. शिवाय, पैशांची देवाण – घेवाण करून तक्रार मागे घ्यावी यासाठी नराधमांनी बलात्कार पीडितेवर दबाव आणला. पण, पीडितेनं आणि तिच्या पतीनं  मात्र नकार देताच बलात्कार पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी रात्री हा सारा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रविवारी शामली कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास तसेच आरोपींना बेड्या ठोकण्यास कुचराई केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. जाळून ठार करण्याच्या प्रयत्नामध्ये पीडितेच्या कमर आणि पायांना जखम झाली आहे.

वाचा – वासनांध! चौदा वर्षाच्या मुलीवर २ वेळा सामुहिक बलात्कार; ५ नराधम अटकेत

काय आहे प्रकरण?

दीड महिन्यापूर्वी पीडितेवर तीन नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देखील दाखल केली. पण, आरोपींना काही अटक झाली नाही. अखेर या नराधमांनी शनिवारी रात्री पीडितेच्या घरी जात तिला प्रकरण मिटवण्यासाठी धमकी दिली. त्यासाठी पैशांचं देखील आमिष दाखवलं गेलं. पण, पीडितेनं नकार देताच तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. सुदैवानं यामध्ये पीडितेला किरकोळ इजा झाली. यानंतर पीडितेनं तिच्या पतीसह पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांना आरोपींना अटक का केली नाही? असा सवाल केला त्यावेळी पोलिसांनी तपास अंतिम टप्प्यात होता. लवकरच आरोपींना अटक केली जाणार होती. असं उत्तर दिलं.

वाचा – बीटेक विद्यार्थीनीचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार