घरदेश-विदेश'गंगा विलास' मार्गक्रमण करतेय; बिहारमध्ये अडकल्याचे वृत्त तथ्यहीन

‘गंगा विलास’ मार्गक्रमण करतेय; बिहारमध्ये अडकल्याचे वृत्त तथ्यहीन

Subscribe

गंगा नदीतून डिब्रूगडसाठी निघालेली गंगा विलास क्रुझ बिहारमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. मात्र गंगा विलास क्रुझ अडकल्याचे वृत्त खोटे आहे. क्रुझचा प्रवास सुरु आहे. सोमवारी, १६ जानेवारीला क्रुझ बिहार येथील छपरा भागात पोहोचली. तेथे क्रुझ काही वेळ थांबली. त्याचवेळी गंगा क्रुझ फसल्याचे वृत्त आले. त्यामुळे एसडीआरएफच्या पथकाला बोलवण्यात आले. पीपा पुल उघडण्यात आला. त्यानंतर क्रुझने पुन्हा प्रवास सुरु केला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. 

नवी दिल्लीः गंगा विलास क्रुझ अडकल्याचे वृत्त तथ्यहीन आहे. गंगा विलास क्रुझचा प्रवास सुरु आहे. ही क्रुझ वेळेत तिचा प्रवास पूर्ण करेल, अशी माहिती स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.

गंगा नदीतून डिब्रूगडसाठी निघालेली गंगा विलास क्रुझ बिहारमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. मात्र गंगा विलास क्रुझ अडकल्याचे वृत्त खोटे आहे. क्रुझचा प्रवास सुरु आहे. सोमवारी, १६ जानेवारीला क्रुझ बिहार येथील छपरा भागात पोहोचली. तेथे क्रुझ काही वेळ थांबली. त्याचवेळी गंगा क्रुझ फसल्याचे वृत्त आले. त्यामुळे एसडीआरएफच्या पथकाला बोलवण्यात आले. पीपा पुल उघडण्यात आला. त्यानंतर क्रुझने पुन्हा प्रवास सुरु केला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण-नौवहन व जलमार्ग मंत्रालयाने (आयडब्ल्यूएआय) गंगा विलास क्रुझ अडकल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. आयडब्ल्यूएआयचे अध्यक्ष संजय बंदोपाध्याय यांनी सांगितले की, गंगा विलास क्रुझ ठरलेल्या वेळेप्रमाणे पटणाला पोहोचली आहे. बिहार छपरा येथे क्रुझ अडकल्याचे वृत्त आधारहिन आहे. ही क्रुझ आपल्या ठरलेल्या वेळेत प्रवास पूर्ण करेल.

छपराचे कार्यकारी मुख्य अधिकारी सतेंद्र सिंह यांनी सांगितले की, गंगा विलास क्रुझ अडकल्याची खोटी माहिती स्थानिक पत्रकारांनी मला दिली. त्यानुसार एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रुझ अडकल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

गंगा विलास क्रुझ अडकली नव्हती. नदीच्या मध्यभागातून क्रुझ प्रवास करते. किनाऱ्याजवळ प्रवाशांना बोटी दिल्या जातात. या बोटीतून पर्यटक पर्यटनाचा आनंद घेतात. त्यामुळे गंगा विलास क्रुझ अडकल्याच्या वृत्ताला काहीच आधार नव्हता, असे अध्यक्ष राज सिंग यांनी स्पष्ट केले.

या क्रुझच्या प्रवासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. ही क्रुझ अडकल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र क्रुझचा प्रवास सुरळीत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले व सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आता ही क्रुझ वेळेत आपला प्रवास निर्विघ्न पूर्ण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -