घरताज्या घडामोडीवाराणसीहून दिब्रुगडला निघालेले गंगाविलास क्रूझ बिहारमध्ये अडकले, प्रशासन सतर्क

वाराणसीहून दिब्रुगडला निघालेले गंगाविलास क्रूझ बिहारमध्ये अडकले, प्रशासन सतर्क

Subscribe

देशातील सर्वात मोठं गंगा विलास क्रूझ बिहारच्या छपरामध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही क्रूझ वाराणसीहून दिब्रुगडला निघाली होती. परंतु ही क्रूझ आता बिहारच्या छपरामध्ये अडकली आहे. तसेच या क्रूझवर स्वित्झर्लंडचे ३१ पर्यटक आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या क्रूझला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर हे क्रूझ वाराणसीहून आसाममधील दिब्रुगडला निघाले होते. परंतु हे क्रूझ बिहारमधील छपरा येथे दाखल झाल्यानंतर येथील गंगा नदीची पातळी कमी असल्यामुळे ते अडकले.

- Advertisement -

क्रूझ अडकल्याची माहिती समजताच एसडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. नदीची पातळी कमी असल्यामुळे क्रूझला किनाऱ्यावर आणणे कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एसडीआरएफच्या टीमकडून छोट्या बोटींच्या सहाय्याने क्रूझमधील पर्यटकांना बाहेर काढले जात आहे.

मोदींनी क्रूझला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गंगा विलास क्रूझ नदीतून ३२०० किमीचा प्रवास करणार असल्याचे सांगण्यात आले होते. छपराचे सीओ सतेंद्र सिंग यांनी सांगितले की, अडकलेल्या क्रूझमधील प्रवाशांना छोट्या बोटींच्या सहाय्याने चिंदर येथे नेण्यात येत आहे.

- Advertisement -

गंगा विलास क्रूझचा वेग अपस्ट्रीम प्रति तास १२ किलोमीटर आणि डाऊनस्ट्रीम २० किमी इतका आहे. क्रूझमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम आहे, तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. याव्यतिरिक्त पर्यटकांच्या सोयीसाठी देखील सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : दिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक; शिवसेना, काँग्रेसबाबत समोर आले धक्कादायक खुलासे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -