Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Coronavirus: गंगेच्या पाण्याने होणार कोरोनावर उपचार, संशोधकांचा दावा

Coronavirus: गंगेच्या पाण्याने होणार कोरोनावर उपचार, संशोधकांचा दावा

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या उपचारामध्ये गंगेचे पाणी प्रभावी ठरू शकते. कारण गंगेच्या पाण्यात आढळणारे सुमारे १३०० प्रकारचे बॅक्टेरिया (फॅक्ट) आहेत, जे अनेक संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. बीएचयू वैज्ञानिक गंगाजलवर संशोधन करत असून त्यांचे प्रयत्न सफलतेच्या दिशेने जात आहेत. नमामी गंगे राष्ट्रीय मिशनने आपले प्राथमिक संशोधन पुढे नेण्यासाठी आयुष मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. जर आयुष मंत्रालय याला सहमत असेल, तर गंगाजलवर वैज्ञानिक संशोधन पुढे नेले जाऊ शकते.

गंगाजलवर संशोधन करणारे बीएचयूचे न्यूरोलॉजी विभागाचे प्रोफेसर विजयनाथ, प्रोफेसर अभिषेक पाठक आणि अलाहाबाद हायकोर्टचे वरिष्ठ वकील अरुण गुप्ता यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना गंगेच पाणी कोरोना उपचारात प्रभावी ठरून शकेल, याबाबतची माहिती दिली. प्रोफेसर मिश्रा म्हणाले की, आम्ही गंगाजलचा कोरोनावर होणार असर जाणून घेण्यासाठी ६०० लोकांचा क्लिनिकल डेटा तयार केला आहे.

- Advertisement -

या संशोधनात असे आढळून आले की, गंगाजल दररोज प्यायल्याने लोकांवर कोरोनाचा असर कमी होतो आणि त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह येतो. यावर वैज्ञानिक दृष्टीकोनातून अधिक संशोधन करण्याची गरज आहे. सरकारच्या मान्यतेशिवाय संशोधन करणे शक्य नाही आहे. सध्या कोरोनासाठी कोणतेही औषध नाही आहे. जगभरात यावर अनेक शोध सुरू आहेत, यामुळे गंगाजलवरही शोध झाला पाहिजे. कारण गाईच्या तोंडातून नैसर्गिकरित्या बाहेर पडत असलेल्या या पाण्यात अनेक असे फॅक्ट आहेत, जे कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

वरिष्ठ वकील अरुण गुप्ता सांगितले की, गंगाजलवरील शोध पत्र राष्ट्रपतींना पाठवले होते. या शोधपत्राच्या आधारे नमामी गंगेने आयसीएमआर तपास करण्यासाठी सांगितले. पण आयसीएमआरने व्हर्च्युअल प्रेझेंटेशन घेतल्यानंतर काही म्हटले नाही. याबाबत हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यावर हायकोर्टाने केंद्र सरकारच्या सर्व संबंधित विभागांना नोटिसा बजावल्या आहेत आणि उत्तरे मागितली आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Covid Vaccine : लसीकरणाची गती पाहून WHO कडून भारताचे जाहीर कौतुक


 

- Advertisement -