घरदेश-विदेशAnil Dujana Encounter : यूपीत कुख्यात गुंड अनिल दुजानाचा एन्काऊंटर; 60...

Anil Dujana Encounter : यूपीत कुख्यात गुंड अनिल दुजानाचा एन्काऊंटर; 60 हून अधिक गुन्हे होते दाखल

Subscribe

उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर येत आहे. कुख्यात गँगस्टर अनिल गुजाना हा या एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे.

उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर येत आहे. कुख्यात गँगस्टर अनिल गुजाना हा या एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने मेरठ येथे ही कारवाई केली. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. ( Gangster Anil Dujana Encounter The encounter of notorious gangster Anil Dujana in UP More than 60 cases were registered )

उत्तर प्रदेश स्पेशल फोर्स टास्कचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल दुजानावर 18 खुनांसह 62 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो टोळी तयार करुन खून, दरोडे घालत असे. यूपी एसटीएफने गेल्या 6 वर्षांत दुजानासह 184 एन्काऊंटर केले आहेत.

- Advertisement -

कोण आहे अनिल दुजाना?

अनिल दुजानाचे मूळ नाव अनिल सिंग असे आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील दुजाना गावातील असल्याने त्याची ओळखही तीच बनली. दोन भाऊ, बहिणीसह त्याच्या कुटुंबात पाचजण आहेत. 5.5 लाख रुपयांची चोरी करुन त्याने 2022 साली एकाची हत्या केली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. अखेर आज झालेल्या चकमकीत तो मारला गेला.

( हेही वाचा: लोकप्रतिनिधींना बाद करणारी तरतुद रद्द करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले )

- Advertisement -

इंदिरा गांधींना दिली होती धमकी

2011 मध्ये अनिल दुजाना याला बादलपूर कोतवाली येथे आयपीसीच्या कलम- 174A प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 20 हजार रुपये दंड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. बादलपूरचे दुजना गाव एकेकाळी कुप्रसिद्ध सुंदर नगर उर्फ सुंदर डाकू म्हणून ओळखले जात होते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात दिल्ली- एनसीआरमध्ये सुंदरची भीती होती. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

बदल म्हणून केली भावाची हत्या

जानेवारी 2012 मध्ये अनिल तिहेरी हत्याकांडात अडकला होता. तुरुंगातून त्याने आपली टोळी चालवण्यास सुरुवात केली. रणदीप भाटी आणि अमित कसाना मदत त्याला मदत करायचे. त्याने तुरुंगातूनच खून आणि खंडणीचे कट रचण्यास सुरुवात केली. जानेवारी 2014 मध्ये सुंदर भाटी टोळीने दुजानाच्या घरावर हल्ला केला होता. र‌ॅपिड फायरिंगमध्ये त्याचा भाऊ जय भगवान मारला गेला. अनिलच्या वडिलांनी सुंदर भाटी याच्यासह आठ जणांनी नावे दिली होती. याचा बदला घेण्यासाठी दुजाना टोळीने सुंदरचा मुलगा राहुलचा खून केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -