घरताज्या घडामोडीSidhu moose wala murder case : होय, माझ्या टोळीनेच केली मुसेवालाची हत्या,...

Sidhu moose wala murder case : होय, माझ्या टोळीनेच केली मुसेवालाची हत्या, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली

Subscribe

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) हत्याकांडप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी चौकशी केली असता लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) मोठी कबुली दिली आहे. होय आमच्या टोळीतील एका सदस्याने मूसावालाची हत्या केली आहे. यासोबतच बिश्नोई म्हणाला की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, त्यामुळे आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.

हे काम मी केलेलं नाहीये. कारण मी जेलमध्ये बंद होतो आणि फोनचा वापर सुद्धा केला नव्हता. परंतु मी हे कबुल करतो की, सिद्धू मुसेवालाच्या हत्यामागे आमच्याच टोळीचा समावेश होता. पंजाबचा एका प्रसिद्ध गायकाचं नाव देखील आहे. मात्र, ते नाव आतापर्यंत एका हिंदी वृत्तपत्राजवळ आहे. सुरक्षेसाठी त्यांनी हे नाव चर्चेत आणलेलं नाहीये, असं लॉरेन्स म्हणाला.

- Advertisement -

मी तिहार तुरूंगात असताना टिव्हीवर पाहिल्यानंतर मला सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडाची माहिती मिळाली. लॉरेन्स बिश्नोईच्या कुबीलवरून कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रार व्यतिरिक्त तुरूंगाबाहेर आपली टोळी चालवणारा सचिन बिश्नोई याचाही सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मूसेवालाच्या हत्याकांडाचे अनेक कनेक्शन आले समोर

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. या हत्येत पंजाबपासून दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ते अगदी कॅनडापर्यंत कनेक्शन समोर आले आहे. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर सिद्धूच्या घराबाहेर धावणाऱ्या वाहनांची देखील छायाचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Sidhu Moosewala Death प्रकरणी आत्तापर्यंत तीन गुंडांना अटक, नेमके आरोप काय?

उत्तराखंडमधून तीन संशयितांना अटक

या हत्येप्रकरणात पोलिसांनी काही कार जप्त केल्या आहेत. उत्तराखंडमधून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस या सर्व प्रकरणांची चौकशी करत आहेत. शिवाय गोळीबार करणाऱ्यांच्या अनेक मदतनीसांना अटकही करण्यात आली आहे. परंतु हा तपास अद्यापही पुढे सरकू शकलेला नाहीये. उलट या प्रकरणात काही नवीन पात्रे दाखलं झाली आहेत.

पोलिसांनी आता लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला प्रोडक्शन वॉरंटवर पंजाबला नेले आहे. दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी संपतला आणले आहे. मात्र, सिद्धू मुसेवालाच्या प्रकरणातही त्याची चौकशी केली जाणार आहे.


हेही वाचा : U19 Women’s T20 World Cup: पहिल्यांदाच खेळवलं जाणार महिला U19 T20 विश्वचषक, कोणते १२ संघ झाले क्वालिफाय?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -