घरक्राइमPrasad Pujari : गँगस्टर प्रसाद पुजारीला अखेर चीनमधून अटक; 20 वर्षांपासून होता...

Prasad Pujari : गँगस्टर प्रसाद पुजारीला अखेर चीनमधून अटक; 20 वर्षांपासून होता फरार

Subscribe

गँगस्टर सुभाष पुजारी उर्फ प्रसाद पुजारी याला अखेर चीनमध्ये अटक करण्यात आली. अटकेनंतर गँगस्टर प्रसाद पुजारीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन पोहोचले आहेत. जवळपास 20 वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर असलेला पुजारीला चीनमधून भारतात आणले.

मुंबई : गँगस्टर सुभाष पुजारी उर्फ प्रसाद पुजारी याला अखेर चीनमध्ये अटक करण्यात आली. अटकेनंतर गँगस्टर प्रसाद पुजारीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन पोहोचले आहेत. जवळपास 20 वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर असलेला पुजारीला चीनमधून भारतात आणले. मुंबईत पुजारीवर हत्या आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. (Gangster Prasad Pujari brought to Mumbai from China by the Mumbai Crime Branch officials)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद पुजारी हा सुमारे 20 वर्षांपासून फरार होता, त्यासाठी पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. प्रसाद पुजारीवर मुंबईत खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये मुंबईत प्रसाद पुजारी विरोधात शेवटच्या वेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक वर्षांपूर्वी प्रसाद पुजारी भारतातून पळून चीनमध्ये पोहोचला होता. तेव्हापासून तो चीनमधून आपली टोळी चालवत होता.

- Advertisement -

भारतीय एजन्सींच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रसाद पुजारीने चीन गाठले आणि एका चिनी महिलेशी लग्नही केले. पण फरार प्रसाद पुजारीचा विशेष एजन्सीनी शोध सुरूच ठेवला होता. अखेर त्याला चीनमध्ये अटक करण्यात आली असून प्रसादला मुंबईत आणण्यात आले आहे.

दरम्यान, मार्च 2008 मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते. ज्याची मुदत मार्च 2012 मध्ये संपली होती. 2020 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने पुजारीच्या आईला म्हणजेच इंदिरा पुजारी हिला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना पुजारीच्या ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याला लवकरच भारतात परत आणता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

याशिवाय, मुंबईतील विक्रोळी येथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारात प्रसाद पुजारी यांचा हात होता. ही गोळीबाराची घटना 19 डिसेंबर 2019 रोजी घडली. या गोळीबारात जाधव थोडक्यात बचावले. दरम्यान, चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर इंदिरा पुजारी यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती.


हेही वाचा – Moscow Attack : मॉस्कोत दहशतवादी हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी; ISISनं स्वीकारली जबाबदारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -