घरताज्या घडामोडीटायगर अभी जिंदा है ! छोटा राजनच्या कोरोनाने मृत्यूची 'ती' अफवाच

टायगर अभी जिंदा है ! छोटा राजनच्या कोरोनाने मृत्यूची ‘ती’ अफवाच

Subscribe

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर कुप्रसिद्ध गॅंगस्टर छोटा राजनला दिल्लीत AIIMS येथे मृत्यू झाल्याचे वृत्त सुरूवातीला समोर आले आहे. तिहारमध्ये छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. त्यानंतर २७ एप्रिलला छोटा राजनला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी AIIMS येथे दाखल करण्यात आले होते. तिहार जेलमधील एका अधिकाऱ्याकडून छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. छोटा राजनला काही सहव्याधींनीही गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचाही विळखा छोटा राजनला ग्रासले होते. पण आज शुक्रवारी कोरोना उपचारादरम्यान छोटा राजनचा ६२ व्या वर्षी एम्स रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण छोटा राजनचा मृत्यू कोरोनाने झाला नसल्याची माहिती आता मिळाली आहे. दिल्ली पोलिस आणि AIIMS च्या अधिकाऱ्यांनी छोटा राजनचा मृत्यू झाल्याचे वृत्त निराधार आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

भारताला हवा असणाऱ्या बड्या गॅंगस्टरपैकी एक असा छोटा राजन होता. तिहारमध्ये एका वेगळ्या कक्षामध्ये छोटा राजनला ठेवण्यात आले होते. पण तरीही कोरोनाचा संसर्ग त्याला झाला असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात समोर आले होते. जवळपास दोन दशके भारतीय यंत्रणांच्या हातावर तुरी देणारा छोटा राजनला इंडोनेशियाच्या बाली येथून तपास यंत्रणांनी २०१५ मध्ये ताब्यात घेतले होते. इंडोनेशिया येथून छोटा राजनला भारतात आणण्यात आले होते. छोटा राजनविरोधात एकुण ६८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये २८ प्रकरणे ही खंडणीशी संबंधित एकट्या महाराष्ट्रात आहेत. भारतातून २००० साली पळ काढण्यात छोटा राजनला यश आले होते. भारत सोडून छोटा राजन अनेक वर्षे बॅंकॉक येथे वास्तव्यास होता. पण अनेक वर्षे त्याने तपास यंत्रणांना वेळोवेळी तुरी दिल्याने तब्बल दोन दशके पळ काढण्यात तो यशस्वी ठरला होता.

कोण आहे छोटा राजन ?

राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन हा मूळचा साताऱ्यातील फलटण तालुक्याती गिरवी गावचा होता. मुंबईतील चेंबूरच्या टिळक नगरमध्ये १९५९ जन्मलेला छोटा राजनची ओळख ८० च्या दशकात दाऊद इब्राहिमचा उजवा हात म्हणूनच ओळख झाली. सुरूवातीला दाऊद आणि छोटा राजन हे दोघेही एकाच गॅंगमध्ये काम करत होते. मात्र कालांतराने दोघांमध्ये खटके उडाल्याने छोटा राजन दाऊद गॅंगपासून वेगळा झाला. त्यानंतर छोटा राजनने आपली स्वतःची अशी वेगळी गॅंग तयार केली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -