Chhattisgarh Naxal Encounter : गरियाबंद (छत्तीसगड) : छत्तीसगड मधील गरियाबंद येथे सुरक्षा दलासोबत झालेल्या भीषण चकमकीत 16 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. यामुळे गेल्या 15 दिवसात तब्बल 28 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे. नववर्ष सुरू झाल्या झाल्या आठवड्याभरातच, 6 जानेवारी 2025 ला छत्तीसगडच्याच विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात आठ जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर देशावर शोककळा पसरली होती. ज्या नक्षलवाद्यांमुळे जवानांना प्राण गमवावे लागले, त्यांचा खात्मा करण्यात यावा, अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. आणि याच भावनेला सुरक्षा दलाने मूर्त स्वरूप दिले आहे. (gariaband encounter 16 naxalites killed weapons also recovered in chhattisgarh in marathi)
या चकमकीत सुरक्षा दलाने अनेक कट्टर आणि घातक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यातील एक तर एवढा धोकादायक होता की, त्याला पकडून देण्यासाठी एक कोटी रुपयाचे बक्षीस घोषित झाले होते. रविवारपासून सुरू असलेल्या या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीनंतर 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडण्यात आले आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये जयराम ऊर्फ चलपती याचाही समावेश आहे. हा चलपती नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे. देशातील अत्यंत धोकादायक नक्षलवाद्यांमध्ये त्याचा समावेश होतो.
Another mighty blow to Naxalism. Our security forces achieved major success towards building a Naxal-free Bharat. The CRPF, SoG Odisha, and Chhattisgarh Police neutralised 14 Naxalites in a joint operation along the Odisha-Chhattisgarh border. With our resolve for a Naxal-free…
— Amit Shah (@AmitShah) January 21, 2025
सुरक्षादलांवर करण्यात आलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये चलपथीचा समावेश होता. त्याला पकडून देणाऱ्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. सीसी मेंबर जयराम ऊर्फ चलपथी ओडिशा कॅडरचा नक्षलवादी होता. सीसी मेंबर मारला जाणे ही पहिलीच घटना आहे.
हेही वाचा – Mahakumbh 2025 : भाजपाकडून धर्मसोहळ्याचे जोरदार मार्केटिंग, ठाकरेंचे टीकास्त्र
गरियाबंदचे एसपी निखिल राखेचा यांनी सांगितले की, आतापर्यंत 16 हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. एक कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या जयराम ऊर्फ चलपती देखील या हल्ल्यात मारला गेला आहे. यासोबतच एसएलआर रायफल सारख्या स्वयंचलित शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. तशी पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.