Homeदेश-विदेशMadhya Pradesh High Court : लसूण मसाला की भाजी...काय आहे हे प्रकरण?

Madhya Pradesh High Court : लसूण मसाला की भाजी…काय आहे हे प्रकरण?

Subscribe

आपल्या जेवणात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी लसूण ही भाजी आहे की मसाल्याचा पदार्थ? आपण कधी हा विचारच केला नसेल. पण याच मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हा शेवटी न्यायालयात गेला.

नवी दिल्ली : रोजच्या जेवणात आपण सर्रास लसणीचा वापर करतो. अनेकदा तर आपले मसालेदार पदार्थ हे आलं – लसणीच्या पेस्टशिवाय पूर्णच होत नाहीत. त्यामुळे लसूण हा भारतीय जेवणातला अविभाज्य घटक आहे याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही. लसणीबाबत एवढं सगळं बोलण्याचं कारण म्हणजे, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर पीठाकडे यासंदर्भात एक अजब प्रकरण आले, आणि हा शेवटी याचा निर्णय न्यायालयाने दिला. (garlic is spice or vegetable finally madhya pradesh high court indore bench gives it verdict)

आपल्या जेवणात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी लसूण ही भाजी आहे की मसाल्याचा पदार्थ? आपण कधी हा विचारच केला नसेल. पण याच मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हा शेवटी न्यायालयात गेला. तब्बल 9 वर्षे या प्रकरणावर युक्तिवाद सुरू होता. आणि शेवटी न्यायालयाने या प्रकरणात आपला निर्णय दिला. मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने लसणीला अधिकृतरित्या भाजी म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भाजी तसेच मसाला म्हणूनही लसणीची विक्री केली जाऊ शकते.

हेही वाचा – Politics : शिवसेनेचा दुसरा सर्व्हे महायुतीसाठी पॅाझिटिव्ह? एवढ्या जागांवर अनुकूल स्थिती

न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी तसेच विक्रेते या दोघांचाही फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या परस्पर विरोधी आदेशांमुळे बऱ्याच काळापासून सुरू असलेला वाद हा या निकालामुळे थांबला आहे. इंदौर पीठाने 2017 मध्ये न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवला. लवकर खराब होत असल्याने 2017 मध्ये न्यायालयाने लसूण भाजी असल्याचा निर्णय दिला होता. (garlic is spice or vegetable finally madhya pradesh high court indore bench gives it verdict)

काय आहे प्रकरण ?

मध्य प्रदेश मंडी मंडळाने 2015 मध्ये लसूण भाजी असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर कृषी विभागाने हा निर्णय बदलला आणि 1972 च्या कृषी उपज मंडी समितीच्या नियमांच्या आधारे लसूण मसाला असल्याचे म्हटले होते. या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील कोणत्या मंडईंमध्ये लसूण विकली जाईल हे निश्चित करण्यात आले. याचा परिणा मध्य प्रदेशातील कमिशन एजंटवर पडला. न्यायालयाने आता म्हटले आहे की, लसूण भाजी आणि मसाला अशा दोन्ही प्रकारांमध्ये विकली जाऊ शकते. यामुळे त्याच्या विक्रीवर काही निर्बंध राहणार नाहीत आणि शेतकरी तसेच विक्रेते या दोघांनाही त्याचा फायदा होईल. या मंडळाची स्थापना ही शेतकरी आणि विक्रेते या दोघांच्या फायद्यासाठी करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना आपल्या उत्पादनाचे चांगले मूल्य मिळेल. दरम्यान, कांदा, बटाटा आणि लसूण कमिशन एजंट असोसिएशनने सर्वात प्रथम 2016 मध्ये या निर्णयाला आव्हान दिले होते.

हेही वाचा – Ajit Pawar : बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं; अजित पवारांचे मोठे विधान

फेब्रुवारी 2017 मध्ये एकाच न्यायाधीशांनी या असोसिएशनच्या बाजूने निर्णय दिला. मात्र, व्यापाऱ्यांनी या निर्णयाला आव्हान दिले. व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की, यामुळे केवळ कमिशन एजंटना फायदा होईल. जुलै 2017 मध्ये मुकेश सोमानी यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली. यामुळे जानेवारी 2024 मध्ये आणखी एक निर्णय आला आणि त्यात लसूण मसाला असल्याचा निर्णय देण्यात आला. (garlic is spice or vegetable finally madhya pradesh high court indore bench gives it verdict)

लसूण व्यापारी आणि कमिशन एजंट्सनी मार्च 2024 मध्ये या निर्णयाला आव्हान दिले. अखेर या प्रकरणाची सुनावणी न्या. एस.ए. धर्माधिकारी आणि न्या. डी. वेंकटरामन यांच्या खंडपीठासमोर झाली आणि त्यांनी 2017 च्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी लसणीसाठी दोन्ही पर्याय मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar